शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
4
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
5
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
6
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
9
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
10
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
11
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
12
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
14
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
15
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
16
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
17
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
18
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
19
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

रात्रीच्या अंधारात ‘एफसीआय’कडून व्यापाऱ्यांची तूर खरेदी

By admin | Updated: April 13, 2017 01:12 IST

नांदुरा- शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली.

नांदुरा : बारदाना नसल्याने आधीच खोळंबलेली शासकीय भारतीय खाद्य निगमची तुर खरेदी चार दिवसांपुर्वी पुर्ववत झाली तोच ११ एप्रिलच्या रात्री अंधारात भारतीय खाद्य निगम चा मार्क असलेल्या पोत्यात तीन, चार दिवसांपुर्वी अचानक येवून पडलेल्या व्यापाऱ्यांच्या तुरीची खरेदी सुरु केली. मात्र महिनाभरापासुन बाजार समितीत तूर विक्रीसाठी हालअपेष्टा सहन करुन त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी संगठीत होवून याबाबत संबंधीत हमाल यांना धारेवर धरले असता त्यांनी पळ काढला. शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली.मागील दोन महिन्यात जेमतेम विस दिवस भारतीय खाद्य निगमकडून तूर खरेदी झाली. त्यामुळे आजही मागील चाळीस दिवसांपासून शेतकरी तूर विकण्यासाठी ठाण मांडून आहेत. सुमारे चार दिवसांपुर्वी बारदाना उपलब्ध झाल्याने खरेदी सुरु झाली. मात्र पुर्वीप्रमाणे यात हेराफेरी होत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आल्याने त्यांनी पाळत ठेवली असता ११ च्या रात्री दोन ते तीन दिवसांपुर्वी बाजार समितीत येवून पडलेल्या व्यापाऱ्यांच्या तुरीचे मोजमाप सुरु झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांनी याबाबत सदर हमालांच्या बारदान्याची तपासणी केली असता तो भारतीय खाद्य निगमचा असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत बाजार समिती संचालक व कर्मचारी यांना फोन करुन या सर्व अनागोंदी कारभाराबाबत जाब विचारला असता त्यांनी दाखल होवून तो माल जप्त केला. याबाबत बाजार समितीने १२ एप्रीलच्या दुपारी पोलीस स्टेशन नांदुरा येथे लेखी तक्रार दिली. यामध्ये अफजल नामक हमाल व इतर तिघांनी कोणतीही परवानगी नसतांना तुरीचा शेतमाल मोजल्याचे नमुद केले असून संबधीतांवर कडक कारवाई त्याचबरोबर याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. १२ च्या दिवसभर शेतकऱ्यांनी याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना धारेवर धरले व तो शासकीय बारदाना त्या हमालांना कसा मिळाला याबाबत जाब विचारुन तिव्र नाराजी बाजार समिती, भारतीय खाद्य निगम व खरेदी विक्री संघाबाबत व्यक्त केली. तसेच यापुर्वी ३ मार्चला खरेदीतील अनागोंदी विरोधात आवाज उठविल्यानंतर जो तुरीचा साठा जप्त झाला होता त्यापैकी काही जप्त माल गायब झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. ग्रेडर खर्चे यांचे घुमजावतर शेतकऱ्यांचा निकृष्ठ तुरीचा माल नाकारणाऱ्या ग्रेडर खर्चे यांना रात्री व्यापाऱ्याचा निकृष्ठ माल कसा पोत्यात गेला, हमालांना बारदाना कोणी दिला, पुर्वी जप्त केलेला माल कसा गायब झाला आदी प्रश्न विचारुन धारेवर धरले असता त्यांनी घुमजाव करीत असमाधानकारक उत्तरे दिल्याने शेतकरी संतप्त झाले होते.