शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभीमानी'च्या कार्यकर्त्यांनी केले ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:23 IST

बुधवारी कळमखेळ येथील पाण्याच्या टाक्यावर चढून स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी शोले आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : मागील वर्षी ऑनलाईन नोंदणी तून वगळलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान जमा करण्यासाठी  26 डिसेंबरपासून शेगाव तहसील समोर सुरू असलेले उपोषण शासन स्तरावरून बेदखल असल्याने संग्रामपुर तालुक्यातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

बुधवारी कळमखेळ येथील पाण्याच्या टाक्यावर चढून स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी शोले आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात 26 डिसेंबरपासून मागील वर्षीच्या ऑनलाइन नोंदणीतून डावललेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल १००० रुपये अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे; परंतू शासनाने याकडे दुर्लक्ष करीत आडमुठी भुमिका घेतल्याने संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 31 डिसेंबर रोजी एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या होत्या तर मंगळवारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. परत  स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असुन पाण्याच्या टाक्यावर चढून शोले आंदोलन केले.

मागील वर्षी शासनानेनाफेङ द्वारे तूर खरेदी केंद्र सुरू केले होते त्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली शेगाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदी करण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्राची पुर्तता करीत टोकन सुद्धा घेतले. टोकन मिळाल्यामुळे ऑनलाईन नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले आज ना उद्या आपली तूर शासन मोजून घेणार या संभ्रमात सर्व शेतकरी होते; परंतु शासनाकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची तुर घरामध्ये पडून राहीली. त्यामुळे शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १००० रुपये देण्याची घोषणा करून सुध्दा आजतागायत शासनाने शेतकऱ्यांना अनुदान न दिल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आले. घोषणा करून मोकळे झालेल्या सरकारला जागे करण्याकरीता शेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले सुरु असलेल्या उपोषणाची दखल आजतागायत घेण्यात आली. आधिच संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे आर्थीक परीस्थितीने कमकुवत झाला. त्याला आर्थीक मदत देऊन बळ देण्याची गरज आहे; परंतू असे काही घडतांना दिसत नाही.उलट हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली आहेत. आंदोलनेही बेदखल होत असल्याने त्या निषेधार्थ बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील कळमखेड येथे संतप्त शेतकऱ्यांनी  पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये  संपर्कप्रमुख मोहन पाटील, संतोष गाळकर, सुनील अस्वार,शिवा पवार,विनोद मोरे सुनिल खंडेराव सह कार्यकर्ते सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkhamgaonखामगावSangrampurसंग्रामपूर