शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:27 IST

Jalgaon Jamod News : सासू-सून व नातू यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने समाजमन हळहळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शहरातील एकाच कुटुंबातील सासू-सून व नातू यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुसरीकडे या घटनेने समाजमन हळहळले आहे.या कुटुंबात आजी, दोन मुले, एक सून व दोन नातू असे सहा जण राहत होते. प्रथम एका मुलाला कोरोनाची लक्षणे दिसताच त्यांनी स्वत:ला शेतात विलगीकरण करून घेतले. परंतु, दरम्यान त्याचा संसर्ग आजी, त्यांचा दुसरा मुलगा, सून व एका नातवाला झाला. त्यामुळे पंचावन्न वर्षे वयाच्या सुनबाई व त्यांचा २३ वर्षे वयाचा मुलगा यांना शेगाव येथे खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. आजी व दोन मुले यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले.  दरम्यान दोन मुलांनी कोरोनावर मात केली. परंतु ८२ वर्षे वयाच्या आजींचा १० मे रोजी मृत्यू झाला.

आई व मुलाने घेतला एकाच दिवशी जगाचा निरोपआजीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच बुधवार १२ मे रोजी ५५ वर्षे वयाच्या कुटुंबप्रमुख सुनबाई यांचे शेगाव येथे कोविड सेंटरमध्ये देहावसान झाले. त्यांचा अंत्यविधी शासकीय नियमाप्रमाणे शेगाव येथेच दुपारपर्यंत आटोपून कुटुंबीय जळगाव येथे सायंकाळी पोहोचले. त्याचवेळी त्यांचा २३ वर्षे वयाचा धडधाकट व धावपळ करणारा मुलगा गेल्याची बातमी या कुटुंबियांना मिळाली. त्याच पावली हे कुटुंब परत शेगाव येथे गेले. रात्री उशिरा मुलावर अंत्यसंस्कार करून परत आले. आई व मुलाचे निधन एकाच दिवशी झाले ही सर्व माहिती गुरुवारी शहरात वाऱ्यासारखी पसरली. सर्व समाजमन हळहळले. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने नगरात किमान सॅनिटायझरची फवारणी करावी अशी जनतेची मागणी आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदcorona virusकोरोना वायरस बातम्या