आमदार संजय गायकवाड यांच्या बुलडाणा येथील संपर्क कार्यालयाच्या सभागृहात ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, माजी आ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शांताराम दाणे, बळीराम मापारी, ऋषी जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राजेंद्र पळसकर, माधवराव जाधव, माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जलजीवन मिशनमध्ये ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रस्ताव आगामी काळात पाठवा, असेही आवाहनही ना. पाटील यांनी यावेळी केले. प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. सूत्रसंचालन व आभार गजानन धांडे यांनी मानले. यावेळी उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमरावती पदवीधरसाठी धीरज लिंगाडे यांच्यावर जबाबदारी
या आढावा बैठकीत आगामी काळात होणाऱ्या विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात शिवसेनेकरिता पदवीधर मतदारांची बुलडाणा जिल्ह्यात नाव नोंदणी करून घेण्यासाठी मोहीम राबविण्याची महत्त्वाची जबाबदारी माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांच्याकडे संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी सोपवली. धीरज लिंगाडे यांनी यासाठी काम करावे आणि पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर यासाठी सहकार्य करण्याच्या सूचनासुद्धा खा. जाधव यांनी याप्रसंगी दिल्या.