शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

 शिर्ला प्रकल्पाचे पाणी खामगावकरांना मिळण्याची शक्यता धूसरच!​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:52 IST

‘दहा वर्षात शिर्ला डॅम प्रोजेक्ट होवू शकला नाही, आता दीड महिन्यात कसा होणार?’ असा प्रश्न खामगावकरांना पडला आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरवासियांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून पालिका प्रशासनाने शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविकत: शिर्ला डॅम हा प्रोजेक्ट २००९ पासून सुरु आहे, मात्र तो पुर्णत्वास आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. कंत्राटदार व पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रकल्प होण्यास दिरंगाई होत आहे. अशात पुढील दीड महिन्यात प्रकल्प पुर्ण करून नागरिकांना पाणी देण्याचे दिवास्वप्न दाखवण्याचा प्रताप पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त केले जात असून ‘दहा वर्षात शिर्ला डॅम प्रोजेक्ट होवू शकला नाही, आता दीड महिन्यात कसा होणार?’ असा प्रश्न खामगावकरांना पडला आहे.सध्या खामगाव शहराला गेरू माटरगाव धरणावरून १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र धरणातील जलसाठा संपुष्टात येत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शिर्ला डॅमवरून खामगावकरांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेमार्फत सुरु आहे. ३० एप्रिलपर्यंतच शिर्ला डॅमवरून पाणी पुरवठा सुरु होईल अशाप्रकारची वल्गना सत्ताधाऱ्यांनी केली होती. त्यानंतर नागरिकांचा रोष बघता ७ मेपासून पाणी नक्की मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दोनदा दिलेल्या आश्वासनानंतर पाणीपुरवठा सुरु न झाल्याने पालिका प्रशासना तोंडघशी पडली आहे. कारण शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. मुळात पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे वास्तव आहे. प्राप्त माहितीनुसार शिर्ला डॅम या प्रोजेक्टची सुरवात २००५ पासूनची आहे. तत्कालीन नगराध्यक्ष सुभाष देशपांडे यांनी दुरदृष्टी ठेवून २०२० पर्यंत शहराची लोकसंख्या विचारात घेवून या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेचा प्लान आखला होता. त्यानंतर सरस्वतीताई खासणे (२००६-२००९) सत्तेत आल्या. २००९ मध्ये अशोकसिंह सानंदा नगराध्यक्ष असतांना वर्क आॅर्डर मिळाली. २००९ ला प्रत्यक्ष काम सुरु झाले. अद्याप हे काम पुर्णत्वास येवू शकले नाही. त्यानंतर सरस्वतीताई खाचणे, गणेश माने, अशोक सानंदा नगराध्यक्ष राहिले. विद्यमान नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांच्या कार्यकाळात पुन्हा या प्रोजेक्टचे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे स्वत: शिर्ला डॅमवर ठाण मांडून आहेत. पालिका प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न असले तरी अनेक काम अद्याप प्रलंबीत असल्याने दीड महिन्यात खामगावकरांना पाणी मिळणे कठीण आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई