शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांवर मेंढपाळांचा हल्ला, ८ जणां विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 12:44 IST

Crime News : १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ८ मेंढपाळांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्य लगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात तशीच घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. गस्तीवर असलेले बुलडाणा एसीएफ व कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला करून शासकीय गाडीच्या काचा फोडून जप्त केलेल्या मुद्देमालासहित अटकेतील आरोपींना पळविण्यात आले होते. या प्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ८ मेंढपाळांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा प्रादेशिक वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक रणजीत रघुवीर गायकवाड हे सोमवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह बुलडाणा-खामगाव मांडणी शिवारात गस्तीवर होते. त्यावेळी जंगलात काही लोक अवैध वनचराई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी मेंढ्या जप्तीची कारवाई सुरू केली व दोन जणांना ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसवले. त्यावेळी मेंढ्याच्या कळपाचा मालक मोतीराम रतन टिळे आला व काही जण आले. त्यांनी वनविभागाच्या शासकीय गाडीवर हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच सहायक वनसंरक्षक गायकवाड व वनविभागाचे संतोष गिरनारे यांना मारहाण करून पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनाही पळवून घेऊन गेले. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात एसीएफ रंजीत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवर हिवरखेड पोलिस ठाण्यात आरोपी मोतीराम रतन टिळे (रा. नांद्री ता. खामगाव) याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.  प्रादेशिक व वन्य जीवचे अधिकारी उपस्थित हाेते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग