शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : शेगावातील महिलेचा अकोल्यात मृत्यू; आणखी आठ पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:55 IST

सरासरी दररोज चार व्यक्ती जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या २१ दिवसात तब्बल ९१ व्यक्ती कोराना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ५६ टक्के रुग्ण हे जून महिन्यात आढळून आले असून सरासरी दररोज चार व्यक्ती जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात १५९ कोरोना बाधीत रुग्ण असून त्यापैकी ३८ रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ६३ अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ५३ अहवाल निगेटीव्ह आले असून आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील लक्ष्मीनगर येथील ५५ वर्षीय व्यक्ती, पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील ३७ वर्षीय महिला आणि संग्रामपूर येथील ३३ वर्षाचा पुरुष, दोन वर्षाची मुलगी आणि ३८ वर्षीय महिलेचा यात समोश आहे. शेगाव येथील जोगडी फैल भागातील चार महिन्याचे बाळही पॉझिटिव्ह असून खामगावातील एक व्यक्तीही पॉझिटिव्ह आली आहे.दुसरीकडे मलकापूर शहरातील हाशीमनगरमधील ५५ वर्षीय व्यक्तीचा १६ जून रोजी मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. या व्यतिरिक्त अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेगाव येथील एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. २० जून रोजी या महिलेचा मृत्यू झाला असून १९ जून रोजी तिला अकोला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नांदुरा तालुक्यातील वाडी येथील महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा पती आधीच पॉझिटिव्ह आला होता. मात्र या रुग्णांची ज्या डॉक्टरांनी तपासणी केली होती त्या डॉक्टरसह त्यांचा संपूर्ण स्टाफचा रिपोर्टही निगेटीव्ह आलेला आहे. त्यामुळे नांदुरेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.रविवारी पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मलकापूरमधील हेडगेवार नगररात राहणारा ३६ वर्षीय व्यक्ती, शास्त्रीनगरमधील २७ वर्षीय महिला आणि आठ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मलकालूप तालुक्यातील धोंगर्डी येथील ७० वर्षीय वृद्ध महिला व ६७ वर्षाच्या पुरुषानेही कोरोनावर मात केली आहे.