शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव : नाफेड केंद्रावर मोजमापात घोळ; शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:05 IST

उडिद, मुग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदीकेंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबररोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. 

ठळक मुद्देशेतक-यांसोबत उद्धटपणाची वागणूक 

विजय मिश्रा लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : उडिद, मुग विक्रीसाठी आणलेल्या शेतकºयांसोबत येथील नाफेड खरेदीकेंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबररोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. मंगळवारी नाफेड केंद्रावर अनेक शेतकºयांनी उडिद, मुग विक्रीसाठी आणले. संध्याकाळ झाली तरी खरेदीचा पत्ता नव्हता. शेतकºयांची २०० ते ३०० वाहने उभी असतांना अचानक खरेदीस सुरवात झाली. मध्येच एकाचा ट्रॅक्टर आत घेण्यात आला. त्यामुळे शेतकºयांनी माहिती काढली असता तो ट्रॅक्टर व्यापा-याचा निघाला. त्यामुळे शेतकºयांनी एकच गोंधळ केला. या प्रकाराची माहिती नाफेडच्या अधिकाºयांना दिल्यानंतरही ते ऐकून घेण्यास तयार नव्हते असा आरोप शेतकºयांनी केला आहे. या प्रकाराची माहिती तहसिलदारांना मिळाल्याने त्याठिकाणी नायब तहसिलदार व पुरवठा अधिकारी  व बाजार समिती सचिवाने धाव घेतली. शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही शेतकºयांना मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले. 

तो ट्रॅकटर श्रीराम इस्टेटचा १३ डिसेंबर हा माल खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी झाली होती. याठिकाणी श्रीराम इस्टेटचे गोडावून आहे. तेथून ट्रॅक्टरमध्ये उडिदाचा माल भरण्यात आला. मध्येच शेतक-यांच्या रांगेत ट्रॅक्टर उभा करण्यात आला. त्यामुळे हा गोंधळ उडाला. 

शेतक-यांचे नोंदवले बयाण मंडळ अधिकारी आर. बी. दीक्षित, पुरवठा अधिकारी चांभारे यांनी शेतक-यांचे बयाण नोंदवले. यामध्ये सैय्यद साजिद सैय्यद साबिर (मनसगाव), विनायक देवीदास फाटे (पहुरजीरा), संतोष ताराचंद चांडक (हाता), गोपाल पांडुरंग आखरे,  वि. के. कंकाळ (मनसगाव) आदी शेतक-यांचा समावेश आहे. 

झालेल्या प्रकाराबाबत आम्ही निश्चित चौकशी करू. यासाठी नाफेड केंद्र प्रमुखांना सांगितले आहे. शेतकºयांची तक्रार आम्ही घेतली आहे. - आर. बी. दीक्षित (मंडळ अधिकारी)

टॅग्स :khamgaonखामगावmarket yardमार्केट यार्ड