शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविकांच्या उपस्थितीत शेगावात श्रींचा पुण्यतिथी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:15 IST

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा २६ ऑगस्ट रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजर करण्यात आला.

ठळक मुद्दे५४0  दिंड्यांची हजेरी मंडळांना भजनी साहित्य वाटप

गजानन कलोरे  शेगाव (बुलडाणा) : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा २६ ऑगस्ट रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजर करण्यात आला. कार्यक्रमाला ५४0 भजनी दिंड्यांची उपस्थिती होती.संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ ते ९ दरम्यान हभप श्रीरामबुवा ठाकूर यांच्या मंदिरात  कीर्तन झाले. श्री गणेशयाग व वरुणयागाची पूर्णाहूती २६ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी हभप श्रीधर बुवा आवारे यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहांडी गोपाळकाळा होईल. यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे. संस्थानच्यावतीने मंदिरात दर्शनासाठी नियोजनबध्द व्यवस्था एकेरी मार्गाने केल्यामुळे भक्तांनी रात्रंदिवस श्रींच्या समाधीचे शिस्तीत दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, पंकज शितूत, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, किशोर टांक, चंदुलाल अग्रवाल यांच्यासह ब्रम्हवृंद यांची उपस्थिती होती. श्रींची नगरपरिक्रमा श्रींच्या पालखीची दुपारी दोन वाजता रथ, मेणा गज, अश्‍वासह नगर परिक्रमा झाली. पुण्यातिथी उत्सवानिमित्त ५४0 भजनी दिंड्यांचा सहभाग नोंदविला. १३0 भजनी मंडळांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले. भजनी दिंडीत १३ हजार ४३५ वारकरी सहभागी झाले होते.