शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव : माजी नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला; नऊ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:01 IST

शेगाव: माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील ज्ञानेश्‍वर पाटील व सर्मथकांनी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता शरद अग्रवाल यांच्या घरावर हल्ला केला असता तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यासह नऊ जणांना सोमवारी अटक करण्या

ठळक मुद्देशेगावात लावलेल्या बॅनरवरून उफाळला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील ज्ञानेश्‍वर पाटील व सर्मथकांनी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता शरद अग्रवाल यांच्या घरावर हल्ला केला असता तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यासह नऊ जणांना सोमवारी अटक करण्यात आली. भाजप नेते शरद अग्रवाल यांचा २१ जानेवारी रोजी रविवारी वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जाहिरातीचे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. त्या बॅनरवर गावातील नामांकित व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर एकच भाऊ, दादा, अण्णा, एकच समाजरत्न असे शब्दप्रयोग करण्यात आले आहेत. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना या नावाने संबोधल्या जात असल्याने शहरातील ज्ञानेश्‍वर पुरुषोत्तम पाटील  यांच्या जिव्हारी लागली व त्यांनी याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी व सर्मथकांनी हातामध्ये लाकडी दंडे घेऊन  माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांच्या घरासमोर मुर्दाबादच्या घोषणा आणि ईल शिवीगाळ करणे सुरू केले. त्यांच्या बंगल्याच्या लोखंडी दारावर लाथा मारल्या. माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे गटनेते शरद अग्रवाल यांच्या घरासमोर काही मंडळी गोळी झाली असून त्यांना शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ठाणेदार डी.डी. ढाकणे हे ताफ्यासह  दाखल झाले. ठाणेदार ढाकणे यांनी जमावाला समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव समजण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्यामुळे त्यांना  पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली, अशी माहिती ठाणेदार डी.डी. ढाकणे यांनी दिली. या प्रकरणी शरद शंकरलाल अग्रवाल यांनी शहर पो.स्टे ला फिर्याद दिली असता पोलिसांनी ज्ञानेश्‍वर पुरुषोत्तम पाटील, ज्ञानेश्‍वर गारमोळे, अजय पऊळ, अमोल ऊर्फ विक्की चव्हाण, पत्रकार मंगेश महादेवराव ढोले, विश्‍वजित शेळके, गोपाल हिंगणे, मंगेश ठाकरे सर्व रा. शेगाव या नऊ जणांविरुद्ध अप.क्र. ३७/१८ कलम १४३, ४४७, २९४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करून रात्री १ वाजताच्या सुमारास सर्व नऊ जणांना अटक करण्यात आली.   या प्रकरणातील आरोपींची तात्पुरत्या जामिनावर पोलिसांनी सुटका केली असली तरी शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निखिल फटिंग हे करीत आहेत. 

टॅग्स :Arrestअटकkhamgaonखामगाव