शेगाव(जि. बुलडाणा) : संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष केंद्रीत झालेल्या शेगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शारदाताई कलोरे यांनी ११ विरुद्ध १३ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी काँग्रेसचेच उमेदवार शैलेंद्र पाटील यांचा पराभव केला. प्रमोद ऊर्फ बंडूबाप्पू देशमुख यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या येथील नगराध्यक्षपदासाठी २६ मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाराकाँच्या वतीने शैलेंद्र पाटील आणि काँग्रेसच्याच ब गटाकडून शारदाताई कलोरे निवडणूक रिंगणात होत्या. दुपारी २ वाजता पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे व सहायक अधिकारी टी. जी. मुल्लाणी मुख्याधिकारी न.प. शेगाव यांच्या देखरेखीखाली निवडणुकीसाठी सभा घेण्यात आली.
शेगाव नगराध्यक्षपदी शारदा कलोरे
By admin | Updated: March 27, 2015 01:39 IST