शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सव गुरुवारपासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:17 IST

मेहकर येथील जगप्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सवाला २३  नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, कीर्तन, प्रवचनाचे  आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रगटदिन महोत्सवाला २३ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात ७ डिसेंबरला महाप्रसादाने होणार महोत्सवाचा समारोप 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील जगप्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी प्रगटदिन महोत्सवाला २३  नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात विविध धार्मिक, कीर्तन, प्रवचनाचे  आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान भाविकांना नयनरम्य पोशाखात  श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ७ डिसेंबरला महाप्रसादाने या महोत्सवाचा  समारोप होणार आहे. या महोत्सवात रविवार, २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सकाळी दहा ते १, दुपारी  ३ ते ५ या वेळेत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.  भागवताचार्य बंडू देव महाराज आचरसोंडकर  (औंढा नागनाथ) यांचे अमृतवाणी तून भागवत कथेचे वाचन होणार आहे. २३ नोव्हेंबरला सकाळी ९.३0 वाजता संस् थांचे अध्यक्ष डॉ. ना. म. सावजी यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहणने या उ त्सवास सुरुवात होणार आहे. दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील नामवंत हरिभक् त परायण महाराजांची कीर्तने होणार आहेत.  प्रवचनाचेही येथे आयोजन करण्यात  आलेले आहे. २६ नोव्हेंबरला सकाळी १0 वाजता मोठय़ा राम मंदिरातून कलश शोभायात्रा  निघणार असून, ११ वाजता श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरुवात होणार आहे.  यावर्षी भागवत कथेचे यजमानपद डॉ. वृषाली व डॉ. विनय सावजी यांनी स्वीकारले  आहे. ३0 नोव्हेंबरला गीता जयंतीनिमित्त सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजताच्या  दरम्यान गीतेचे अखंडपाठ होणार आहे. १ डिसेंबरला दुपारी ११ ते ५ महिला व  मुलींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, डॉ. अरुण  देशपांडे रुग्णांना तपासणार आहेत. ३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्रींची पालखी व शोभायात्रा काढण्यात येईल.४ डिसेंबरला सकाळी १0 वाजता  देवदत्त महाराज पितळे यांचे काल्याचे कीर्तन  होणार असून, प्रक्षाळ पुजेसाठी रात्री मंदिर बंद होईल. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११  वाजता भव्य महाप्रसादाने उत्सवाचा समारोप होणार आहे. उत्सवादरम्यान आयोजि त विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बालाजी संस् थानच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :sharangdhar balaji, mehekarशारंगधर बालाजी मेहकर