शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनीच लावली शेतकऱ्यांची वाट -  प्रा. श्रीकांत तराळ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 15:59 IST

खामगाव: राज्यात जाणता राजा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली, असा सणसणाटी आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक तथा किसान अधिकार यात्रेचे आयोजक श्रीकांत तराळ यांनी बुधवारी येथे केला.

ठळक मुद्देराष्ट्रीय किसान महासंघाच्या किसान अधिकार यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी ते खामगावात आले असता, त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हेच धोरण शरद पवारांचे राहीले आहे.

खामगाव: राज्यात जाणता राजा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली, असा सणसणाटी आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक तथा किसान अधिकार यात्रेचे आयोजक श्रीकांत तराळ यांनी बुधवारी येथे केला.राष्ट्रीय किसान महासंघाच्या किसान अधिकार यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी ते खामगावात आले असता, त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. शरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. केंद्रात दहा वर्ष कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. शेतकरी नेत्यासोबतच एक प्रबळ मराठा नेते म्हणूनही पवारांची राज्यात ‘पॉवर’आहे. पवारांच्याच कार्यकाळात सन २००४ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली. २००६ मध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आल्या. या शिफारशी आल्यानंतर ११ सप्टेंबर २००७ रोजी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने एक शेतकरी निती तयार केली. ४० पानांच्या या निती धोरणावर शरद पवारांची कृषीमंत्री म्हणून स्वाक्षरी आहे. पवारांच्या कार्यकाळात स्वामीनाथन आयोग लागू होईल, अशी अशा पल्लवित झाली होती. मात्र, दुर्दैवान २०१३ पर्यंत स्वामीनाथन आयोगाविषयी कुठेही चर्चा नाही. तथापि, कुठल्याही आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्या लागू कराव्या लागतात. २००७ मध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शरद पवार कृषीमंत्री असताना स्वीकारण्यात आल्या. मात्र, त्यानंतर या धोरणाबाबत देशात आणि राज्यात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली. हे शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हेच धोरण शरद पवारांचे राहीले आहे. त्यामुळे पवारांच्या शेतकºयांविषयी असलेल्या आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असेही प्रा. तराळ शेवटी म्हणाले.स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही टाळल्या जातो!शरद पवार त्यांच्या भाषणात स्वामीनाथन हा शब्द वापरत नाहीत. तर स्वामीनाथन कमिटी हा उल्लेख ते जाणीवपूर्वक करतात. याचा अर्थ पत्रकारांनीच त्यांना विचारावा, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कमिशन या व्यापक अथार्लाही त्यांच्याकडून अतिशय क्षुल्लक दृष्टीकोनातून पाहण्यात येते. ही बाब जाणता राजाला साजेशी नसल्याची स्पष्टोक्तीही प्रा. तराळ यांनी जोडली.

 

टॅग्स :khamgaonखामगावSharad Pawarशरद पवार