शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:16 IST

आरोपी ईश्वर विनोद विरशीद याने पीडित मुलास तो घरी एकटा असताना टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणान्यायालयाने ईश्वर विनोद विरशीद यास सात वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, प्रकरणात पीडित मुलास दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. बुलडाणा येथील विशेष न्यायाधीश श्रीमती सी. आर. हकारे यांनी हा निकाल दिला.बुलडाणा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने ३१ जानेवारी २०१९ रोजी तक्रार दिली होती. आरोपी ईश्वर विनोद विरशीद याने पीडित मुलास तो घरी एकटा असताना टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले होते. दरम्यान टिव्ही पाहत असताना दरवाजा लावून ईश्वर विनोद विरशीद याने या ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. सोबतच जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनाक्रमापूर्वीही आरोपीने एकदा या अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण यासह अन्य काही कलमानुसार गुन्हा दाखल करून ईश्वर विनोद विरशीद विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान वादी पक्षातर्फे पीडित मुलगा, त्याची आई, पंच साक्षीदार, संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी अशा एकूण सात जणांची साक्ष तपासण्यात आली. त्यामध्ये पीडित मुलगा, त्याची आई व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अन्य साक्षीदारांचीही साक्ष प्रकरणाशी सुसंगत ठरली होती.या प्रकरणात वादी पक्षातर्फे अर्थात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वसंतराव लक्ष्मण भटकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली व आरोपी विरोधात प्रबळ असा युक्तीवाद केला. सोबतच आरोपीस अधिकाधिक शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. वादी, प्रतिवादींचा युक्तीवाद ऐकूण बुलडाणा न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती सी. आर. हकारे यांनी आरोपी ईश्वर विनोद विरशीद यास सर्व साक्षीपुरावे व दिलेले निवाडे यांचा विचार करून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोबतच २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विविध कलमांच्या अनुषंगाने याप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाच्या आहेत. दरम्यान या प्रकरणात आरोपीस करण्यात आलेला दंड न भरल्यास आरोपीस आणखी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष तेजराव जवंजाळ यांनी केला तर पैरवी म्हणून किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालय