शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डनकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:53 IST

बुलडाणा : येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह  तथा बालगृहातील कनिष्ठ काळजीवाहक (वॉर्डन)ने  दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार ७  सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी  वॉर्डनवर विविध गुन्हे दाखल केले असून, अटक  करण्यात आली आहे.  

ठळक मुद्देगुन्हा दाखल आरोपीला अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह  तथा बालगृहातील कनिष्ठ काळजीवाहक (वॉर्डन)ने  दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार ७  सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी  वॉर्डनवर विविध गुन्हे दाखल केले असून, अटक  करण्यात आली आहे.   चिखली रोडवर मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह आहे. या  मुलांच्या वसतिगृहामध्ये बाल न्यायालयाकडून  पाठविलेली लहान मुले आहेत. येथे नवृत्ती बारीकराव  राजपूत (वय ५२) कनिष्ठ काळजीवाहक म्हणून  नोकरीवर आहे.  या निरीक्षणगृहात अनाथ, एक पालक  असलेले तसेच विधी संघर्षग्रस्त असे ११ मुले आहेत.  या ठिकाणी मुलांच्या देखभाल  जबाबदारी येळगाव ये थील रहिवासी नवृत्ती बारीकराव राजपूत याला देण्यात  आली होती. मागील काही वर्षांपासून नवृत्ती केअर टेकर  म्हणून कारभार पाहत होता. २७ ऑगस्ट रोजी राजपूतने  १६ व २३ वर्षीय युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केले.  तसेच याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीही  दिली; मात्र मुलांनी याबाबत रिमांड होमचे अधीक्षक  बी.  एल. राठोड यांच्याकडे तक्रार केली. राठोड यांनी या  घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आपल्या वरिष्ठांना  कळविले. याप्रकरणी  वरिष्ठ जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी पी.एस. एंडोले यांनी पाच  सदस्यांची समिती नियुक्त करून या प्रकरणाची  जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. दरम्यान, समितीने या  प्रकरणाची तपासणी करीत राजपूत याच्याविरोधात  अनेक पुरावे मिळवून अधीक्षकांसमोर सादर केले.   त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या  तक्रारीनंतर नवृत्ती राजपूतवर कलम ३७७ अन्वये तसेच  बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आयपीसी कलम ८  अंतर्गत व पॉस्को कायदा २0१0 नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी नवृत्ती राजपूतला  गुरुवारी सायंकाळी अटक केली. शुक्रवारी त्याला  न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

सीसी क ॅमेर्‍याचा अभावशहरातील रिमांड होम येथे नियमानुसार सीसी कॅमेरे  बसवावयास हवे होते; मात्र संबंधित विभगाच्यावतीने  याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता उघड होत आहे.  या ठिकाणी तत्काळ सीसी कॅमेरे बसविण्यात यावे, अशी  मागणी बालकांच्यावतीने केली जात आहे.

यापूर्वीही राजपूतवर गुन्हे दाखलराजपूत पूर्वी पैठण येथील बालगृहात नोकरीवर होता. ते थेही त्याच्यावर मुलांच्या लैंगिक छळाबाबत गुन्हे दाखल  करण्यात आले होते; मात्र यातून तो निर्दोष सुटला.  २0११ साली राजपूत बुलडाणा येथील निरीक्षणगृहात  रुजू झाला. -