शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संसर्गामुळे हाेतेय किडनीचे माेठे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:42 IST

Severe kidney damage due to corona infection : किडनीचा आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना झालेल्या रुग्णांच्या सर्वच भागावर परिणाम हाेताे. विशेषत: शुन्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांच्या किडनीवर त्याचा परिणाम हाेताे. तसेच किडनीचा आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे. त्यामुळे, अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येते. काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहचली आहे. अनेक जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. काेराेना झालेल्या रुग्णांच्या रक्त, फुफ्फुसासह किडनीवरही परिणाम हाेताे.  कोरोनामुक्त झालेल्या लहाण बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धाेकादायक ठरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच हा किडणीचा आजार हाेत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.  लहान मुलांना काेराेना झाल्यानंतर या आजाराच्या लक्षणाकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना काेराेनाची लागण झाली हाेती. तसेच काही लहान मुलेही पाॅझिटीव्ह आली हाेती. किडणीचा आजार असलेल्या रुग्णास काेराेना झाल्यास त्याची विशेष काळजी घेतली जाते. 

किडनीच्या रुग्णांची विेशेष काळजी किडनीचा आजार असलेल्या रुग्णास काेराेना हाेण्याची शक्यता अधीक असते. किडणीग्रस्तांना काेराेनामुळे    मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे.त्यामुळे आराेग्य विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येते. या रुग्णांची डायलेसीस व इतर उपचार नियमीत करण्यात येतात. तसेच त्यांना आहाराविषयीही मार्गदर्शन करण्यात येते. 

किडनीच्या रुग्णांना काेराेना हाेण्याचा धाेका अधीक असताे. त्यामुळे, अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येते. शुन्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे, पालकांनी लहान मुलांना काेराेना झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डाॅक्टरांना दाखवावे.                 डाॅ. - नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा