शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सात गावात हायड्रोकार्बन शोधाच्या दृष्टीने प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:52 IST

हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत  असून, तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्यादृष्टीने प्रयत्न होणार  आहे. २0२२ पर्यंत कच्चा तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र  सरकारचे प्रयत्न आहे.

ठळक मुद्देलोणार तालुक्यात लवकरच सर्व्हेकच्चा तेलाची आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत  असून, तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्यादृष्टीने प्रयत्न होणार  आहे. २0२२ पर्यंत कच्चा तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र  सरकारचे प्रयत्न आहे. त्याचा एक भाग म्हणून हायड्रोकार्बन मिळण्याच्या संभाव्यतेबाबत  कृष्णा-गोदावरी खोर्‍यात सध्या शोध घेण्यात येत आहे.लोणार तालुक्यातील  येवती, बिबखेड, तांबोळा, हत्ता, हिवराखंड, ब्राम्हणचिकना, खा परखेड, महारचिकना, खळेगाव ही गावे यासाठी निश्‍चित करण्यात आली असल्याची  माहिती आहे. महसूल आणि वन विभागाचे उपसचिव यांनी यासंदर्भात लोणार तहसील  कार्यालयाला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्‍यामध्ये  हायड्रोकार्बन साठय़ांची शक्यता तपासण्याच्या दृष्टीने हा सेस्मीक सर्व्हे (हायड्रोकार्बनचा  शोध घेण्यासंदर्भातील प्रक्रिया) करण्यात येत आहे.  तेल व नैसर्गिक वायू महामंडळातंर्गत  हे काम होत आहे. लोणार तालुक्यातील जमिनीखाली पेट्रोलियम पदार्थांचे साठे सापडू  शकतात. त्या दृष्टिकोनातून या जमिनीखालील खडकांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात  झाली आहे.

७0 टक्के तेलाची आयातदेशात ७0 टक्के खनिज तेलाची आयात आजघडीला केली जाते. २0२२ पर्यंत यामध्ये  दहा टक्क्यांनी घट करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुषंगाने देशातील ज्या भागात  यापूर्वी असे सर्व्हे झाले नाहीत, त्या भागात त्याचा शोध घेऊन देशांतर्गत तेलसाठे  शोधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच हा एक भाग आहे. सोबतच स्वच्छ इंधनाचे स्रोत  म्हणून नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सिमेंट, खत, स्टील  उद्योगात इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर शक्य आहे, अशी माहिती भाजपा तालुका  सरचिटणीस प्रकाश माधवराव नागरे यांनी दिली.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवर