शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या टोळीकडून दोन देशी कटट्यांसह सात काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 17:28 IST

Crime News या चाेरट्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील ११ गुन्हे व पुणे जिल्ह्यातील चोरीचे एकुण ६ गुन्हे असे एकुण १७ गुन्हे उघडकिस आले आहेत.

बुलडाणा : दुचाकी लंपास करणारी टाेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून दाेन देशी कट्यासह सात जीवंत काडतूस जप्त केले. पाेलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टाेळीला अटक करून पाेलिसांनी १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.   गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीवर असताना सोमनाथ बाबुराव सावळे  रा. डोंगरशेवली ता.जि. बुलडाणा ह.मु. मांजरी खुर्द ता. हवेली जि. पुणे यास वरवंड फाटा येथे अटक केली हाेती. त्याची तपासणी केली असता  त्याचेकडे दाेन देशी कट्टे, ७ जिवंत काडतुस, एक स्कुटी व एक मोबाईल फोन असा दाेन लाख ४५ हजार रुपयांचा एवज जप्त केला हाेता. त्याची पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता गोपाल कोंडु चव्हाण रा. डोंगरखंडाळा ता.जि. बुलडाणा , मयुर अनिल राठोड,  शैलेश सुरेश जाधव  तिन्ही रा. डोंगरखंडाळा व मंगेशबबन जेऊघाले वय रा. वरवंड यांची नावे समाेर आली. पाेलिसांनी पाचही जणांना अटक केली. त्यांनी बुलडाणा व पुणे जिल्हयात मागील वर्षभरापासुन विविध कंपनीच्या बऱ्यास दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली.या दुचाकी   मनिष बाबुराव जाधव रा. बुलडाणा ,  संदीप नामदेव गावंडे रा डोंगरखंडाळा, स्वप्निल राजेंद्र गायकवाड रा. वरवंड , दत्तात्रय देवराव जेऊघाले रा. वरवंड , पांडुरंग लालसिंग जाधव रा. करवंड , कोंडुगोबा चव्हाण रा. डोंगरखंडाळा यांच्याकडुन पाेलिसांनी जप्त केल्या. पाचही आराेपींकडून पाेलिसांनी दाेन देशी कट्टे, ७ जिवंत काडतुस,  एक स्कुटी , मोबाईल फोन व १३ दुचाकी असा १५ लाख २० हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे.  या चाेरट्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील ११ गुन्हे व पुणे जिल्ह्यातील चोरीचे एकुण ६ गुन्हे असे एकुण १७ गुन्हे उघडकिस आले आहेत. ही कारवाइ पोलीस अधीक्षक  अरविंद चावरिया सा.,  अपर पोलीस अधौक्षक, खामगाव हेमराजसिंग राजपुत सा.,  अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनात,पो.नि. बळीराम गिते यांच्या आदेशान्वये पोउपनि निलेश शेळके, पाेलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव व पोलीस अंमलदार सुधाकर काळे, दिपक पवार, सुनिल खरात, गणेश शेळके, युवराज शिंदे व चालक राहुल बोडे यांनी केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी