शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोणार येथील उपोषणाची सांगता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 15:42 IST

पंचायत समिती कार्यालयासमोर बसलेल्या दोन्ही उपोषण कर्त्यांशी १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले.

ठळक मुद्देरिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष महेंद्र पनाड, प्रविण अवसरमोल, शेख मुस्तफा शेख नाज अहेमद हे तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. यामध्ये बेघर झालेल्या अतिक्रमण धारकांना घरे देण्यात यावी, या मागणीसाठी उपोषणास बसले होते. १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले.

 

लोणार : जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराच्या पूर्वेकडील बेघर अतिक्रमण धारकांना घरकुलाचा लाभ द्यावा, यासाठी तहसिल कार्यालयासमोर बसलेल्या व तालुक्यातील नांद्रा येथील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर बसलेल्या दोन्ही उपोषण कर्त्यांशी १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले.लोणार सरोवराच्या पूर्वेकडील काठावरील वसलेल्या अनधिकृत / अतिक्रमित घरे नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात १६ एप्रिल रोजी  जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये बेघर झालेल्या अतिक्रमण धारकांना घरे देण्यात यावी, या मागणीसाठी ३० एप्रिल रोजी रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष महेंद्र पनाड, प्रविण अवसरमोल, शेख मुस्तफा शेख नाज अहेमद हे तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. तसेच तालुक्यातील नांद्रा गावातील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून रस्ता व पाईप लाईन खुली करून देण्यात यावी, या मागणी करिता लोणार पंचायत समिती समोर नांद्रा येथील सुमित्रा मोरे, कौशल्य वाढवे, कांताबाई घुगे, राधाबाई वाणी, लक्ष्मीबाई सांगळे, वैशाली मोरे, वंदना डोळे, छाया डोईफोडे उपोषणास बसले होते. या दोन्ही उपोषण कर्त्यांशी १ मे रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर व नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी चर्चा करून उपोषण सोडविले. यावेळी शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी, पं.स.सभापती निर्मलाताई जाधव, अजय हाडोळे, सुभाष मोरे उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार