शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सेवेकऱ्याच्या मुलीचा दहावीच्या परीक्षेत झेंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  हलाखीच्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देत, सेवेकऱ्याच्या मुलीने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. कोणताही ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  हलाखीच्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देत, सेवेकऱ्याच्या मुलीने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. कोणताही शिकवणी वर्ग  न लावता वैष्णवी पेसोडे हीने देदिप्यमान यश संपादन केले.  शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठचा निकाल १०० टक्के लागला असून, वैष्णवीने शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.शेलोडी येथील जागृती आणि सजनपुरी येथील तपोवन आश्रमात सेवेकरी असलेल्या केशव पेसोडे यांची परिस्थिती अंत्यत हलाखिची आहे. प्रतिकुल परिस्थितीत संसाराचा गाडा ओढताना त्यांची प्रचंड ओढाताण होते.   घरखर्च भागवावा की मुलांचे शिक्षण पूर्ण करावे? असा दुहेरी पेच समोर असताना पेसोडे यांनी वैष्णवीला शाळेत प्रवेश दिला. अभ्यासात हुशार असलेल्या वैष्णवीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शनिवारी जाहीर झालेल्या निकालात घवघवीत यश संपादन केले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, कोणताही शिकवणी वर्ग न लावता, तिने मिळविलेले यश हे देदीप्यामान असल्याची प्रतिक्रीया आता समाजमनात उमटत आहे. ९२.२० टक्के गुण घेत जागृती ज्ञानपीठ शेलोडीमधून ती अव्वल ठरली आहे. या यशाबद्दल वैष्णवीचा जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांची सत्कार केला. यावेळी समाजोत्थानासाठी झटणारे प्रत्येक महापुरूष आपले आदर्श असून, समाजातील वंचित आणि कष्टकºयांचरणी आपले यश समर्पित आहे. भविष्यात आयएएस अधिकारी होवून समाजातील गरीब कष्टकºयांची सेवा करण्याचा आपला संकल्प असल्याचे वैष्णवीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 सत्कर्माच्या सुंगधाचा हा दरवळ आहे. जागृती येथील जागृती ज्ञानपीठचा शंभर टक्के निकाल लागला असून, ग्रामीण भागातील मुलींनी प्राप्त केलेले यश अतुलनीय आहे. नापासांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल ‘जागृती’ने घडविले. त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर ‘जागृती’चा भर आहे. सकारात्मक प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे.- प.पू. शंकर महाराजसंस्थापक, जागृती ज्ञानपीठ, शेलोडी. 

टॅग्स :khamgaonखामगावSSC Resultदहावीचा निकाल