शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डा येथे दिव्यांग महिलेची निर्घुण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 11:54 IST

हिला ही तिचा चुलत भाऊ महादेव मांगोजी खरात यांच्या घरी खेर्डा खुर्द येथे एकटीच राहत होती.

ठळक मुद्दे याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.महिलेचा मृत्यू हा संशयास्पद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम खेर्डा खुर्द येथे 6 डिसेंबरच्या रात्री लिलाबाई मोतीराम खरात या दिव्यांग अविवाहित  महिलेची घरात निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटना कशामुळे घडली असावी याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. या बाबत माहिती अशी की सदर   महिला ही तिचा चुलत भाऊ महादेव मांगोजी खरात यांच्या घरी खेर्डा खुर्द येथे एकटीच राहत होती. तिला आई-वडील भाऊ वगैरे कोणीही नाही. घटनेच्या दिवशी तिच्यासोबत चुलत भावाची नऊ वर्षीय मुलगी शारदा ही सुद्धा त्या घरात झोपलेली होती. ती तिसऱ्या वर्गात आहे. घटना उघडकीस येतात स्थानिक पोलीस पाटील योगेश म्हसाळ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिली त्यानंतर तात्काळ पोलीस पथक ठाणेदार सुनिल जाधव यांचे नेतृत्वात खेर्डा येथे दाखल झाले त्यांनी सदर घटनेची, तसेच घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपीचा छडा लावण्यासाठी डॉग स्कॉड बोलावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. महिलेचा मृत्यू हा संशयास्पद असून तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.  (प्रतिनिधी )

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोदMurderखून