शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधीर, गतिमंद युवतीवर अत्याचार प्रकरणी नराधमास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:10 IST

मूकबधीर, गतिमंद युवतीवर अत्याचार प्रकरणी नराधमास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मूकबधीर आणि गतीमंद असलेल्या मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका ७० वर्षीय नराधमास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. टी.सूर्यवंशी (खामगाव )यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. खामगाव तालुक्यातील पारखेड येथे २८ मार्च २०१६ रोजी एका गतीमंद आणि मूकबधीर मुलीचे रात्री अपहरण करण्यात आले. गावातीलच दिनकर त्र्यंबक भुटे (७०) या इसमाने गतीमंद मुलीला झोपडीत उचलून नेले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पिडीतेच्या वडिलांना समजताच, त्यांनी  खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत पिडीतेचे वडील आणि ग्रामस्थांनी आरोपीस पकडून ठेवले. पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केल्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे भादंवि कलम ३६३,  ३६६, ३७६(२) अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने १० साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.  पिडीतेसह वैद्यकीय अधिकारी अश्विनी जायभाये आणि तपास अधिकारी संजय निकुंभ यांचीही साक्ष याप्रकरणी महत्वाची ठरली. अ‍ॅड. रजनी बावस्कार(भालेराव) यांनी युक्तीवाद करताना आरोपीच्या जन्मठेपेची मागणी केली. मात्र, आरोपीच्या वयाचा विचार करता, न्यायालयाने कलम ३६३ मध्ये ३ वर्ष सक्तमजुरी दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तिन महिन्यांची शिक्षा, कलम ३६६ मध्ये ५ वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा आणि कलम ३७६ (२) १०वर्ष शिक्षा, चार हजार रूपये दंड , दंड न भरल्यास ९ महिन्यांची शिक्षा सुनावली. आरोपीस सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले. घटनेपासून आरोपी कारागृहात अटक आहे.(प्रतिनिधी)पिडीतेची साक्ष घेण्यासाठी शिक्षकांची मदत!अत्याचार प्रकरणातील पिडीता ही मूकबधीर आणि गतीमंद आहे. त्यामुळे या पिडीतेची न्यायालयात साक्ष घेताना खामगाव येथील मूकबधीर विद्यालयातील शिक्षकांचे सहकार्य घेण्यात आले. मूकबधीर विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने पिडीतेने दिलेली साक्ष आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यास मोलाची ठरली.पिडीतेच्या अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव!अत्याचारग्रस्त पिडीता ही मूकबधीर आणि गतीमंद आहे. त्यामुळे सदर पिडीतेला अर्थसहाय्य मिळावे म्हणून जिल्हा विधी सेवा समितीने न्यायालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते.
टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा