शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठवा, अन्यथा वेतन थांबवणार

By संदीप वानखेडे | Updated: August 25, 2023 20:21 IST

शिक्षण विभागाचा खासगी संस्थांना इशारा

बुलढाणा : पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांमध्ये रिक्त असलेल्या जागांची बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे. खासगी संस्था बिंदू नामवलीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर शिक्षण विभागाने वेतन थांबविण्याचा इशारा दिला आहे.

राज्यभरात जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत. त्यासाठी सध्या संचमान्यता आणि बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात खासगी संस्थांमध्ये अनेक जागा रिक्त असतानाही काही शाळा बिंदू नामावलीचा प्रस्ताव पाठवत नसल्याचे समाेर आले आहे. हीच स्थिती राज्यात आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी खासगी संस्थांना बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

खासगी संस्थांकडून दाखवल्या जातात कमी जागाराज्यभरात जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित खासगी शाळांमध्येही शिक्षकांची पदे माेठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शासनाकडून गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक भरती पूर्ण हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यातच २०१७ मध्ये शिक्षक अभियाेग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पाच वर्षांनंतर मुलाखतीसाठी बाेलावण्यात येत आहे. आधीच माेठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. त्यामुळे, संस्थाचालकांनी न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची आशा संस्थाचालकांना आहे. त्यामुळे संस्थाचालक पूर्ण जागा दाखवत नसल्याचे चित्र आहे.