शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणे भोवले :  ५३ मेडिकल्सचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:34 IST

Medical licenses suspended : सात महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

- भगवान वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यात चांगलेच भोवले आहे. कारण, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील ५३ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, एका मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.  १३ तालुके असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात हजाराच्या ज‌‌वळपास परवानाधारक औषधी विक्री केंद्रे आहेत. या केंद्रांची मागील सात महिन्यांत अन्न व औषध विभागाने केल्या पडताळणीत तब्बल ५३ मेडिकल्समध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. या औषधी विक्री केंद्रचालकांना याबाबत खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र, खुलाशाला साजेसे असे उत्तर न मिळाल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने या औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले असल्याची माहिती आहे. पुढील काळातही या औषधी विक्री केंद्रांवर विशेष लक्ष असून, त्यामध्येही त्रुटी आढळल्यास त्या संचालकांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती  देण्यात आली आहे. 

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच औषधी विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेक जण बगल देताना दिसतात. अशांवर अन्न व औषध विभागाचा वॉच असून, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. - अ.तु. बोर्डे, सहायक आयुक्त, औषधी विभाग,           बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाMedicalवैद्यकीय