शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सलाईनच्या द्रावणाची रेमडेसिविर म्हणून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:20 IST

Remedicivir in Buldhana : आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

बुलडाण्यात बनावट रेमडेसिविरची विक्री?बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केलेल्या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या ९ रेमडेसिविर इंजेक्शन पैकी आठ इंजेक्शन बनावट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. अन्य रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये सलाईनमधील पाणी टाकून ते विकण्याचा धंदाच या तीनही आरोपींनी सुरू केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा येथील जांभरून रोडवर आणि येळगाव फाटा येथे कारवाई करून राम शंकर गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण विष्णू तरमळे (रा. पिंपळगाव सराई) आणि संजय सुखदेव इंगळे, रा. हतेडी, ह. मु. विदर्भ हाऊसिंग सोसायटी बुलडाणा) यांना शुक्रवारी अटक केली होती. चौकशीत त्यांच्या कडून नऊ रेमडेसिविर इंजेक्शन, सहा अँटीबायोटिकची इंजेक्शन जप्त केले होते. पोलिसांच्या चौकशीत या आरोपींनी वापरलेल्या इंजेक्शनमध्येच सलाईनमध्ये वापरण्यात येणारे ०.९ टक्के एनसीएल सोडियम क्लोराई टाकून तेच रेमडेसिविरचे इंजेक्शन म्हणून विक्री करण्याचा प्रयत्न चालवला होता. आता हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडून बुलडाणा शहर पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रसंगी शहरातील ज्या दोन नामांकित रुग्णालयात हे तिघे काम करत होते त्या रुग्णालयातील डॉक्टरांचीही तपासाचा एक भाग म्हणून प्रसंगी चौकशी होण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री होत असल्याची दोन प्रकरणे उजेडात आली आहे. शुक्रवारच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या नऊ इंजेक्शन पैकी एकच ोरिजनल इंजेक्शन होते तर अन्य आठ इंजेक्शन ही बनावट होती. दरम्यान आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोग शाळेत अन्न व अैाषध प्रशासन विभाग तपासणीसाठी पाठविणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरbuldhanaबुलडाणा