शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड खरेदी केंद्रावर आत्मक्लेश आंदोलन

By admin | Updated: March 3, 2017 00:24 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी : बारदान्याअभावी रोखलेली खरेदी पूर्ववत करा!

चिखली, दि.२ - गत आठ दिवसांपासून येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पोते (बारदाना) नसल्याचे कारण समोर करून तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक व छळ होत असल्याने येथील खरेदी केंद्रावर तातडीने आवश्यक बारदाना उपलब्ध करून देत खरेदी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत २ मार्च रोजी खरेदी केंद्रावर शेतमालासह उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसमवेत भर उन्हात तब्बल पाच तास ठिय्या देऊन आत्मक्लेश आंदोलन छेडले होते. यंदा निसर्गाच्या कृपेने शेतकऱ्यांना तुरीचे बऱ्यापैकी उत्पन्न हाती आले आहे. मात्र, बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल ५ हजार ५० रूपये भावानुसार नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून चिखली येथील नाफेड केंद्रावर तुरीच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर व इतर वाहनांद्वारे शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत, तर २ मार्च रोजी सुमारे २५००० हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र, या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याचे कारण समोर करून खरेदी मोजमाप बंद आहे. यामुळे शेतकरी वर्गाला आठ ते दहा दिवसांपासून आपल्या तुरीची रखवाली करावी लागत आहे, वारंवार बारदाना पोत्याची मागणी करूनही पोते मिळत नसल्यामुळे नाफेडला पोते उपलब्ध करून खरेदी पूर्वत करण्यात यावी, या मागणीसाठी २ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्यावतीने पाच तास उन्हामध्ये बसून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी व सचिव अजय मिरकड यांनी आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन उचित कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले. मात्र ३ मार्च रोजी खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, अनिल चव्हाण, भरत जोगदंडे, राम अंभोरे, विजय सुरूशे, बाळू कुटे, सुधाकर सपकाळ व शेतकऱ्यांनी यावेळी दिला.