शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:30 IST

Selection of three schools in Buldana district मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकली विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील शाळांचा समावेश आहे.

- नवीन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती  सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण अभियानासाठी  निवड करण्यात आली आहे.  त्यामध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकली विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील शाळांचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती  सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण आभियान” राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून १०० आदर्श शाळांची निवड करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मोताळा  तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकळी विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड जिल्हा परिषद शाळांची नावे मुंबई येथे या उपक्रमासाठी पाठविण्यात आली होती. शुक्रवारी  या तिन्ही शाळांची निवड झाल्याचे मुंबई येथून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा  भौतिक विकास, शाळा समिती बळकटीकरण, आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम पूर्ण ताकदीने राबविण्यात येणार आहेत. सदर योजने अंतर्गत राज्य मूल्यांकन समितीमार्फत निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्री बाई फुले जयंतीला आदर्श शाळा म्हणून निवड व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सिंदखेड येथील शाळेच्या निवडीबद्दल सरपंच सीमा कदम यांनी आनंद व्यक्त केला असून, समितीने दिलेले निकष पूर्ण करून सिंदखेड शाळा राज्यासाठी नवा आदर्श निर्माण करेल, त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया त्यांनी‘लोकमत’शी बोलताना  दिली. 

अभियानाची  उद्दिष्टेभौतिक सुविधांमध्ये मुला - मुलींना स्वतंत्र शौचालय, शुद्ध पाणी, हॅन्ड वॉश स्टेशन, बसण्यासाठी बेंच, शाळेला संरक्षण कुंपण राहील.  यासोबतच पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्यसाठी स्वच्छता ठेवणे,  गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती बळकटीकरण यांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा