शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जगात जे जे घडते ते उघड्या डोळ्यांनी बघा- अतुल पेठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:30 IST

डोक्यातील मेंदूच्या विवेकी आधारावर समोरच्या गोष्टींचे आकलन केले पाहिजे, असे मत प्रख्यात नाट्यकलावंत अतुल पेठे यांनी  बुलडाणा येथे केले.

बुलडाणा: आज आपल्या अवतीभवती जगामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्या आपण उघड्या डोळ्यांनी बघितल्या पाहिजे. सांगोवांगी असणाºया गोष्टींवर विश्वास न ठेवता आपल्या डोक्यातील मेंदूच्या विवेकी आधारावर समोरच्या गोष्टींचे आकलन केले पाहिजे, असे मत प्रख्यात नाट्यकलावंत अतुल पेठे यांनी  बुलडाणा येथे केले.रविवारी बुलडाण्यातील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या उन्हाळी बालवाचन अभियानातंर्गत व्यक्तीमत्व विकासासाठी विविध कलांची साधना या विषयावर बालकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘किमया’ या वेगळ््या धाटणीच्या एकपात्री नाटकाच्या प्रयोगानिमित्त ते बुलडाण्यात आले होते. अतुल पेठें मुलांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, आज विविध माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या माहितीचे रुपांतर ज्ञानामध्ये करणे गरजेचे आहे. बालपणापासूनच जे करायचं ते चांगलंच करायचे, ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. चांगला अभ्यास करणे, चांगला व्यायाम करणे, चांगले छंद जोपासणे, चांगले मित्र जोडणे, तसेच चांगलीच साहित्य, कला, आणि संस्कृतीचे जाण आणि भान वृद्धिंगत करणे. यातून माणूस म्हणून आपण खºया अर्थाने घडणार आहोत, असेही ते म्हणाले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी याप्रसंगी मनमोकळी उत्तरे दिली. याच कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकासाचे तज्ज्ञ मार्गदर्शक तुषार दोडिया यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना हसत-खेळत आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल सजग राहण्याचे महत्त्व विशद केले. आपण आपल्या रंगरुपाला महत्व न देता आपल्यामधील गुणवत्ता ओळखता आली पाहिजे, असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाला प्रगती वाचनालयाचा उन्हाळी बालवाचन वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वाचनालयाचे ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड यांनी केले तर नरेंद्र लांजेवार यांनी अतुल पेठे यांचा सविस्तर परिचय करून दिला. दरम्यान यावेळी बालकांसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा