शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात तिहेरी तलाकचा दुसरा, तर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:05 IST

Triple Talaq . पतीने माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीनवेळा तलाक उच्चार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

ठळक मुद्देशे.मोहसीन अ.कादर या युवकासोबत शेगाव येथील युवतीचे  दीड वर्षांपूर्वी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते.लग्नानंतर पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले.पतीसह सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : चिखली येथील एका महिलेने शेगाव पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीनवेळा तलाक उच्चार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचेही नमूद केल्याने पोलिसांनी पतीसह तीन जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले. तिहेरी तलाक देणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, अशा पद्धतीने तोंडी तलाक देण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. चिखली येथील शे.मोहसीन अ.कादर या युवकासोबत शेगाव येथील युवतीचे  दीड वर्षांपूर्वी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. अनेकवेळा पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीसह सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अनैतिक संबंधाला विरोध करीत असल्याने २२ नोव्हेंबर रोजी विवाहितेला बेदम मारहाण करत घरातून हाकलण्यात आले.  ७ डिसेंबर रोजी पती, सासू, सासरा व इतर तीन जणांनी शेगावात येऊन मुलीकडील मंडळींना अश्लील शिवीगाळ केली. पती शेख मोहसीन याने तीन तलाक असा उच्चार करत सर्वजण निघून गेले. याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी विवाहितेने शेगाव शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पती शे. मोहसीन अ. कादर,  अ. कादर अ. रज्जाक,  मालन बी अ. कादर या तिघांसह इतर तीन जणांविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत तसेच भादंविच्या विविध कलमान्यये गुन्हे दाखल करण्यात आले. सर्व आरोपी फरार आहेत. पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावtriple talaqतिहेरी तलाक