शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

खामगाव, शेगावातील सावकारांच्या घराची झडती

By सदानंद सिरसाट | Updated: February 15, 2024 21:47 IST

कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा): अवैध सावकारीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने खामगाव, शेगाव शहरातील सावकारांच्या घरांची झडती घेण्यासाठी सहकार विभागाच्या पथकाने गुरुवारी धाव घेतली. यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तऐवज व धनादेश असे एकूण ५२ दस्त जप्त करण्यात आले. तर खामगाव शहरातील कमलेश अशोक टावरी, प्रतिभा अशोक टावरी बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या तीन खोल्या, तीन कपाटे सीलबंद करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या आदेशाने सावकारी पथकाने ही झडती घेतली. खामगाव येथील घनश्याम नेभनदास गुरुबाणी व दीपक मोतीराम गुरुबाणी यांनी तक्रार केली. त्या तक्रारीतील गैरअर्जदार अशोक गोपीकिसन टावरी (मयत), कमलेश अशोक टावरी, प्रतिभा अशोक टावरी, रायगड कॉलनी, तसेच अर्जदार श्याम बलदेव शाहू, दीपक बलदेव शाहू, मिलिंद श्याम शाहू, शेगाव यांचीही तक्रार होती. त्यानुसार गैरअर्जदार न्यू. मोबाइल वर्ल्ड, रवी चंदुलाल हेमनाणी व दिलीप हेमनाणी, छ. शिवाजी चौक, शेगाव, रमेश जगदीश प्रसाद चांडक, भैरव चौक, शेगाव यांच्या घरी पथक पोहोचले. त्याशिवाय, अर्जदार विठ्ठल दिलीप अवळे, इतर ५, रा. माखरीया मैदान, खामगाव यांच्या तक्रारीवरून संगीता संजय सोळंके, सोनाक्षी संजय सोळंके, रा. माखरीया मैदान, खामगाव या ठिकाणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अधिकाराचा वापर करून झडती घेतली. त्यामध्ये गैरअर्जदारांच्या घरातून तसेच आस्थापनेतून संशयास्पद कोरे चेक, कोरा बाँड पेपर, हिशेबाच्या नोंदवह्या जप्त करण्यात आल्या.- चार पथकांनी घेतली झडती

या कारवाईसाठी चार पथकांची नियुक्ती केली होती. पथक क्रमांक १ मध्ये यु.के. सुरडकर, प्रमुख तथा डी.एम. चौधरी, डी.बी. बोंडे व एस.एस. बाहेकर, एन.एस. सोनुने, ए.आर. ढोरे, जी.आर. दहीभात, एन.एम. वाघमारे, पथक क्रमांक-२ मध्ये प्रमुख ए.एस. खंडारे, वाय.एम. घुसळकर, आर.ए. डहाके, ए.एच. भांबेरे, व बी.एस. गुप्ता, पथक क्रमांक ३ मध्ये प्रमुख एस.सी. अग्रवाल, आर.बी. बाबर, जी.टी. सुरडकर, जी.एस. गाढे, आर.बी. सिरसाट, ए.व्ही. तरमळे व एस.बी. खोडके, तर पथक ४ मध्ये प्रमुख एस.पी. जुमडे, के.एस. गावंडे, एस.के. चौरे, एस.के. घाटे, एस.एस. पवार व सी.एम. गोंधळेकर, पथकातील पंच म्हणून एस.एच. चिंचोले, आर.आर. सदार, डी.आर. महाले, एस.एस. कोळसे, व्ही.एम. गोसावी, एस.व्ही. किलबिले, एस.पी. पवार व एस.बी. तायडे यांचा सहभाग होता. तसेच पोलिस कर्मचारी कविता मोरे, किरण साबळे, सीमा पवार, हिना खान, विक्की खरात, दीपक जाधव, केशव घुबे, तायडे साहेब, पल्लवी कड सहभागी होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी