शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

शिल्पकला: कल्पनेतून वास्तवाकडे जाण्याचा मार्ग - प्रा.मधुकर वंजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 16:24 IST

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क    खामगाव : मनुष्याच्या डोक्यातील अमूर्त कल्पनेला मूर्त स्परूप देण्याचे माध्यम शिल्पकला होय. ...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : मनुष्याच्या डोक्यातील अमूर्त कल्पनेला मूर्त स्परूप देण्याचे माध्यम शिल्पकला होय. शिल्पकलेत ध्यानस्थ अवस्था लाभते.शिल्पकलेला प्राचीन इतिहास असून आधुनिक युगातही शिल्पकलेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. शिल्पकला क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबई येथील जे.जे.स्कूल आॅफ आर्ट, शिल्पकला विभागाचे प्रमुख प्रा. मधुकर वंजारी यांच्याशी टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगाव येथे साधलेला संवाद...

 शिल्पाचे पामुख्याने प्रकार कीती?शिल्पांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.राऊंड शिल्प- हे शिल्प आपल्याला सर्व बाजूंनी पाहता येतं. उदा. महापुरुषांचे पुतळे आणि दुसरे उठाव शिल्प- हे शिल्प एकाच बाजूने पाहता येते थोडक्यात इमारतीवरील शिल्प होय.

आपल्या कला क्षेत्रातील प्रवासाबद्दल काय सांगाल?शेंदुरजना घाट ता. वरूड जि.अमरावती हे माझं मुळ गाव. येथे १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी मुंबई येथे गेलो. तिथे जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये चित्रकलेचा छंद वर्गाशी जुळलो. चित्रकला शिक्षक विजय बिजवे यांच्या मार्गदर्शनामुळे शिल्पकलेशी एकरूप झालो. जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्येच अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. १२ वर्षांपासून तेथे शिल्पकला विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. शिल्पकलेमुळे माझ्या समोरील रोजगारासोबतच भविष्याचीही चिंता मिटली.

 आपल्या मागदर्शनात तयार झालेल्या विद्यार्थ्यांबाबत काय सांगाल?पूर्वीपेक्षा चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढता आहे. जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मध्ये २९ वर्षांच्या सेवेत अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं भाग्य लाभले. यामध्ये शिल्पा गुप्ता, मुंबई या विद्यार्थीनीने ‘व्हीडीओ मांडणी’शिल्प कलेत जागतिक स्तरावर नाव लौकीक मिळवून दिला.  वलय शेंडे, नागपूर आणि संदिप पिसाळकर यांनी संघर्षातून आपली वाट चोखाळली.

भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकलेला पुरातन इतिहास आहे. इ. स. पूर्व ६ व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो. याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे प्राप्त होते.प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता.

शिल्पकलेचा अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. ?प्राचीन मंदिरांवरील मनमोहक कलाकृतींमुळे आपल्याला त्या काळातील शिल्पकलेचा अंदाज येतो. शिल्पकला खूप जुनी असली तरी सद्यस्थितीत या कलेला चांगलाच वाव आहे. सेट डिझायनिंग आणि थ्री.डी अ‍ॅनिमेशन यासारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावताहेत. महाराष्ट्रात जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्स मुंबई, सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट्स, जि.रत्नागिरी, कलाचार्य पंधेगुरुजी कलाविद्यालय, खामगाव, कलामंदिर महाविद्यालय, कोल्हापूर, ललित कला महाविद्यालय,नाशिक या पाच ठिकाणी हा अभ्यासक्रम चालविला जातो. 

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत