शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
6
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
7
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
8
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
9
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
10
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
11
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
12
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
13
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
14
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
15
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
16
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
18
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!
19
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
20
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
Daily Top 2Weekly Top 5

छाननीमध्ये ४४५ उमेदवारी अर्ज अवैध

By admin | Updated: July 22, 2015 23:48 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींसाठी १४ हजार १0 उमेदवारी अर्ज मंजूर.

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ८0२ जागांसाठी १४ हजार ४५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते; मात्र छाननीमध्ये २१ जुलै रोजी एकूण ४४५ अर्ज बाद झाल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या १४ हजार १0 झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा २३ जुलै हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर एकूण संख्या कळेल. जिल्ह्यात एकूण दाखल झालेल्या १४ हजार ४५५ उमेदवारी अर्जांपैकी ४४५ अर्ज बाद झाले, तर इच्छुक उमेदवारांचे १४ हजार १0 अर्ज मंजूर करण्यात आले. त्यात बुलडाणा तालुक्यातील १६0२, चिखली १६८७, देऊळगाव राजा ७५३, सिंदखेड राजा १00२, मेहकर १0४0, लोणार ४७९, मलकापूर ७७३, मोताळा १३४0, नांदूरा ११७१, खामगाव १९६४, शेगाव ८0६, जळगाव जामोद ६९६, संग्रामपूर तालुक्यातील ७१५ असे एकूण १४ हजार १0 अर्ज वैध ठरले. जिल्ह्यात प्रथमच ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे निवडणुकीस इच्छुक उमेदवारांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी नाना कसरती कराव्.ा लागल्या. काही ठिकाणी गावातील ज्येष्ठ नेत्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मदत केली. दरम्यान, २३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ असल्यामुळे अनेक उमेदवारांची त्यासाठी मनधरणी सुरू आहे. ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार ग्रामंपचायत निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन अर्ज दाखल होत असल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व २५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण १४ हजार ४५५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत एकूण ४४५ अर्ज बाद झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या १४ हजार १0 झाली. अर्ज मागे घेण्याचा २३ जुलै हा शेवटचा दिवस असून, दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीत किती उमेदवार कायम राहतात, हे कळणार आहे. निवडणूक रणधुमाळीची रंगत त्यानंतरच खुलणार आहे.