शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना लिपिकाला अटक

By admin | Updated: February 13, 2016 02:19 IST

निरीक्षक दुकाने व संस्था कार्यालयातील घटना.

खामगाव : दुकानाचा परवाना देण्यासाठी ३ हजार २00 रुपयांची लाच मागणार्‍या खामगाव येथील दुकाने निरीक्षक व संस्थेच्या कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारीला दुपारी रंगेहात पकडले. खामगाव येथील कार्यालयात पंचासमक्ष लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने लिपिक शेषराव सुखलाल जाधव यांच्या विरोधात ही कारवाई केली. रतन रामलाल मोरे यांच्या वडिलांचे निधन झाल्याने वडिलोपाजिर्त हार्डवेअर अँन्ड बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचे नाव बदलून, मोरे यांना पत्नी व त्यांच्या नावाने दुकानाचे परवाने हवे होते. मात्र, निरीक्षक दुकाने व संस्थेमधील लिपिक शेषराव सुखलाल जाधव याने दोन्ही परवान्यासाठी प्रत्येकी १६00 रुपये या प्रमाणे ३ हजार २00 रुपयांची लाच रतन मोरे यांच्याकडे मागितली होती. या प्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर ११ फेब्रुवारी रोजी पडताळणीची कार्यवाही झाली होती. त्यानुषंगाने १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात येऊन खामगाव येथील निरीक्षक दुकाने व संस्था कार्यालयामध्ये ३ हजार २00 रुपयांची लाच स्वीकारताना मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा येथील रहिवासी असलेले शेषराव सुखलाल जाधव (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी रंगेहात अटक केली. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, अपर पोलीस अधीक्षक व्ही.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. भाईक, एएसआय श्याम भांगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नेवरे, पोलीस नायक संजय शेळके, संतोष यादव, चालक दानीश यांनी ही कारवाई केली. लाच मागणार्‍याची टोलफ्री क्रमांक १0६४ संपर्क साधून माहिती द्यावी, असे एसीबीचे उपअधीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले.