शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 ‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:44 IST

आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे.

-ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे १ हजार ८ शेतकरी लाभार्थी आहेत. आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांनाही कृषी संजीवनीचा लाभ मिळणार असल्याने जिल्ह्यात याची व्याप्ती वाढणार आहे.शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येतात. अनेक शेतकरी शेतीबरोबरच विविध व्यवसायही करत आहेत. शेतकºयांना शेतीसोबतच पूरक व्यवसायाला हातभार लागण्याच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू आहे. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी चार हजार गावे व विदर्भातील पूर्णा नदी खोºयातील खारपाणपट्टयातील ९३२ गावे अशा एकूण पाच हजार १४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात २०१८ पासून आतापर्यंत ३९६ गावांमध्ये या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.१९ सप्टेंबपर्यंत या योजेलचा १ हजार ८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. परंतू या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी संख्येत आता चांगलीच वाढ होणार आहे. हा प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकºयांबरोबरच पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये परसातील कुक्कुटपालन, शेततळे, ठिबक सिंचन, पीव्हीसी/एचडीपीई पाइप, शेडनेटमधील लागवड साहित्य, बिजोत्पादन, फळलागवड, बंदिस्त शेळीपालन, तुषार सिंचन, विद्युत मोटार, विहिर पुनर्भरण, शेडनेट या घटकांसाठी शेतकºयांना लाभ दिला जात आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. तसे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.- उमेश जाधव,प्रकल्प विशेषज्ञ, (कृषी),नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना