शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शाळा सुरू, मात्र महाविद्यालये बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:14 IST

Buldhana News महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  काेराेना महामारीचे संकटत पाहता, मार्च महिन्यांपासून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद केले हाेते. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, शासनाने ५ ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. मार्च महिन्यांपासून काेराेनामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अध्यापन सुरू असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी त्रस्त झाले आहे.  काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सुरुवातीला ९ वी ते १२वीपर्यंत शाळा सुरू केल्या हाेत्या. त्यानंतर, २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याविषयी शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थी जागरूक आहेत. मात्र, तरीही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

महाविद्यालये सुरू हाेण्याची प्रतीक्षा लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या मात्र, महाविद्यालये सुरू करण्यासाठी केवळ चर्चाच सुरू आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे. अनेक महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कच राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 

लहान मुलांच्या शाळा शासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, माेठ्या मुलांचे महाविद्यालये बंदच आहेत. गत ९ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे, शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. - पूजा पवार, विद्यार्थीनी  

गत ९ महिन्यांपासून केवळ आऑनलाइन क्लास सुरू आहे. अनेकवेळा नेटवर्क राहत नसल्यने अध्ययन व्यवस्थीत हाेत नाही. शासनाने काेराेना विषयक नियमांचे पालन करून महाविद्यालये सरू करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमही मागे पडला आहे. - शेफाली जाधव, विद्यार्थीनी  

काेराेनामुळे महाविद्यालये बंदच आहेत. परीक्षाही आऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेउन एक महिना झाला. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू झाले नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान हाेत आहे. महाविद्याये सुरू करण्याची गरज आहे.- राेहन खरे, विद्यार्थी

मार्च महिन्यांपासून  महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. शासनाने लहान मुलांच्या शाळा सुरू केल्या असल्या तरी महाविद्यालये सुरु केले नाही. त्यामुळे, शासनाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची गरज आहे. - अक्षय गाेळे, विद्यार्थी

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालय