शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने साहित्याची जबाबदारी शाळांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:59 IST

Schools News : शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : संचारबंदीमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर बारावीची परीक्षा सध्या होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आपले आहे. मात्र, यादरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. अशातच शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.संचारबंदीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बोर्डाच्या परीक्षा सोडून पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न देता पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे. तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील ओझे काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. दहावीची २३, तर १२ वीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय व माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा,  तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. परिणामी, शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्य:स्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य संभाळणे ही मोठी जबाबदारी असल्यामुळे शाळांतील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे.

परीक्षा कधी?दहावी बारावीच्या लेखी ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलून बारावीच्या परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा विचार होता. मात्र, आता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दहावीच्या साहित्यासंदर्भात नवीन निर्णय येईपर्यंत शाळांना ते साहित्य जपावे लागणार असून, नंतर सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे. बारावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मुख्याध्यापक म्हणतात... 

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे साहित्य १२ एप्रिलला मिळाले होते. हे सर्व साहित्य सांभाळणे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. आपण सर्व साहित्य व्यवस्थित कुलूपबंद ठेवले आहे. आता दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्या. त्यामुळे बोर्डाचे जे आदेश येतील, त्यानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.-सुरेश हिवरकर, मुख्याध्यापक 

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळाexamपरीक्षा