मेहकर : तालुक्यातील भालेगाव येथील म.पु.मा. शाळेत नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत नसल्याने, पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठविण्यावर बहिष्कार टाकून अनोखे आंदोलन केले. यामुळे शिक्षकांना शुक्रवार व शनिवार रोजी विद्यार्थ्यांविनाच शाळा भरवावी लागली.म.पु.मा. शाळा भालेगाव येथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या सात वर्गांचा कारभार केवळ पाचच शिक्षकांवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेवर नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी पं.स. शिक्षण विभागाकडे पालकावर्गांंच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती; परंतु त्यावर दखल घेण्यात आली नसल्याने पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठविण्यावर बहिष्कार टाकून अनोखे आंदोलन केले. त्यामुळे शिक्षकांनी शुक्रवार व शनिवारला विद्यार्थ्यांविनाच शाळा भरविली.
शिक्षकासाठी शाळेवर बहिष्कार
By admin | Updated: September 14, 2014 00:47 IST