संग्रामपूर (बुलडाणा): पातुर्डा फाट्यावरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या बोअरमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याने कवठळ, हिंगणा, कुंभारखेड या गावांना पाणीटंचाईचा चटका सोसावा लागत आहे. चोंडी टाकळेश्वर येथील पाणीपुरवठा करणार्या जलस्वराज्यच्या विहिरीत पावसाळ्याचे पुराचे पाणी घुसल्याने ते पिण्यायोग्य नाही. काकोडा गावात पाणी आहे, पण क्षारयुक्त असल्याने या सर्व गावातील नागरिकांना आतापासून जंगला तून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. वापरासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे, पण पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असताना पंचायत समितीकडून उ पाययोजनांबाबत कुठलेही नियोजन दिसत नाही.कवठळ, हिंगणा, कुंभारखेड गावाला पातुर्डा फाट्यावरून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा आहे. या ठिकाणी शुद्ध पाण्याचे स्रोत नसल्याने याच पुरवठय़ावर मदार आहे. उन्हाळा सुरू होण्याअगोदर हिवाळ्यातच या पुरवठय़ाच्या स्रोतामध्ये आवक घटल्याने प्रादेशिक विभागाकडून ग्रामपंचायतीला तसे पत्र देण्यात आले व पाणीटंचाई लक्षात घेता, १५ ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नमूद केले आहे. सद्य:स्थितीत कवठळचे नागरिक काकोडा शिवारातून शेतातून पिण्याचे पाणी नेत आहेत. या गावाची लोकसंख्या विचारात घेता, पाण्याची टंचाई सर्वांनाच डोकेदुखी ठरणारी आहे.
पाणी पातळी घटल्याने टंचाई
By admin | Updated: November 9, 2014 23:22 IST