शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीची प्रार्थना आता कोरोनापासून बचावाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:53 IST

यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे, तर कोरोनापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे, तर कोरोनापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे. ५ जून रोजी असलेल्या वट पौर्णिमेवर कोरोनाची गडद छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पहिल्यांदाच आपल्या घरीच वट पौर्णिमेचे पूजन करावे लागणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धार्मिक कार्यक्रमही बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे हे संकट वटपौर्णिमेवरही निर्माण झाले आहे. वटपौर्णिमा सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजल्या जातो. सुवासिनी महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाच्या साक्षीने महिला श्रद्धाभावाने उपवास करून हे व्रत करतात. मात्र यंदा ५ जून रोजी होणाऱ्या वटपौर्णिमेवर कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. पतीच्या दीर्घायुष्यासोबत कोरोनाचे हे संकट टाळण्याची प्रार्थना महिलांकडून होणार आहे. महिलांचा महत्त्वाचा सण कोरोनामुळे घरातच साजरा करण्याची वेळ आली आहे. वडाजी पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी होते. महिला व युवतींची ही मैफिल कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रश्नही यानिमित्त समोर येत आहे. घरातच हे पूजन केले तर संसर्गापासून बचाव होऊ शकतो.

सौभाग्यलंकारामध्ये मास्कसौभाग्यलंकार परिधान करून महिला वडाजी पूजा करण्यासाठी बाहेर पडतात. परंतू या सौभाग्यलंकारामध्ये महिलांना मास्कचाही वापर करावा लागणार आहे. नटणे, सजणे यामध्ये मास्क सुद्धा महत्त्वाचे झाले आहे.कोरोनाचे हे संकट पाहता प्रत्येक महिलेने आपल्या घरातच वट सावित्रीचे हे व्रत पूर्ण करणे आवश्यक आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी एकाच ठिकाणी महिलांची गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.- लता देशमुख, मेहकर.

वटसावित्रीचे पूजन महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. परंतू यंदा कोरोनामुळे ही पूजा घराबाहेर पडून करणे धोक्याचे आहे. त्यामुळे आम्ही घरातच हे विधीवत हे पूजन पूर्ण करून कोरोनाचे संकट टळण्याची प्रर्थना करू.- रश्मी पाध्ये, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपरा