बुलडाणा : जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये जाती-पातीची गणिते मांडून सध्या प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ता विजयाचा दावा करीत आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये लढती चुरशीच्या झाल्या आहेत. या पृष्ष्ठभूमीवर रविवारी बाहेर येणारा निवडणुकीचा निकाल हा पाच ते दहा हजाराच्या आत-बाहेरच खेळता राहील, अशी चिन्हे आहेत. बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद व चिखली या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली असल्याने निकालाचे दावे-प्रतिदावे, प्रत्येक सवर्ेक्षण तसेच सट्टाबाजारा तही संभ्रम आहे. या प्रकारामुळे राजकीय पंडितही चक्रावून गेले असून आता सर्वांना रविवारची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना शासनाच्या गुप्तचर विभागाचीही दमछाक होताना पहायला मिळत आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना किमान दोन मतदारसंघांमध्ये, तर काँग्रेस-राष्ट्रवादी एक, भाजपा दोन व भारिप एका जागी विजय मिळवेल, असा अंदाज आहे. हा अंदाज ठरवितानाच सेनेची काँग्रेससोबत असलेली काट्याची टक्कर सेनेची एक जागा वाढवू शकते, तर भाजपाची काँग्रेस व इतर पक्षासोबत असलेली असलेली चुरस भाजपाची किंवा काँग्रेसची एक जागा कमी-जास्त करू शकते. त्यामुळे गुप्तचर विभागही चक्रावून गेल्याचे समोर आले आहे. बूथनिहाय मतदानाची टक्केवारी समोर आले असल्याने प्रत्येक बुथ वर मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर काय फरक पडला, याचा अंदाज घेतला जात आहे. या अंदाजामध्ये कोणी कोणासाठी काम केले, कोणाचा निरोप आला होता, निरोप देणारा व घेणारा यांच्यामधील राजकीय सामंजस्य याचाही विचार केला जात आहे.
सट्टाबाजार, गुप्तचर विभाग, राजकीय पंडितही संभ्रमात
By admin | Updated: October 18, 2014 00:08 IST