शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: August 12, 2015 00:01 IST

प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू ; ३१ ऑगस्ट व ९ सप्टेंबर रोजी होणार निवड.

बुलडाणा : जिल्हय़ातील ५२१ ग्रामपंचायतींपैकी अविरोध झालेल्या २८ ग्रामपंचायती वगळून ४९३ ग्रामपंचायतमध्ये ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. त्यामुळे आता निवडून आलेल्या उमेदवारांनी सरपंच,उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ३१ ऑगस्ट रोजी २२८ तर ९ सप्टेंबर रोजी २८८ ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंचाची निवड होणार आहे. तर उर्वरित पाच ग्रामपंचायतीचे सरपंच निवडीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीपैकी २२८ ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट महिन्यात तर २८८ ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबर महिन्यात तर ५ ग्रामपंचायतीची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे नियमानुसार ऑगस्ट महिन्यात मुदत संपत असलेल्या २२८ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा ऑगस्टमध्ये होणे आवश्यक आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी २२८ ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या २८८ ग्रामपंचायतींची सभा ९ सप्टेंबर रोजी होणार असून, सरपंच, उपसरपंचपदाची निवड होणार आहे. या सभेंचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तालुक्याचे तहसीलदार करणार असून लवकरच पिठासिन अधिकार्‍यांची निवड होणार आहे. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीपैकी २६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी निघाले आहे. त्यामुळे २६१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे, तसेच अनेक ग्रामपंचायतीचे महिला आरक्षण नसताना खुल्या किंवा त्या ग्रामपंचायतीच्या जातनिहाय आरक्षण असलेल्या महिलांची निवड होण्याची शक्यता आहे. एकूणच आरक्षण असलेल्या २६१ ग्रामपंचायतीपेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर महिला राज येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सदस्यांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.