शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला पंढरपुरसाठी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 15:22 IST

पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची पालखी ८ जून रोजी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल. तत्पुर्वी, श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजतमुखवट्याचे पुजन करण्यात येईल. यानंतर विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत हजारो भक्तांच्या साक्षीने श्रींची पालखी मंदिरातून ‘गण गण गणात बोते’ असा नामघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरसाठी मार्गस्थ होईल.‘श्रीं’ ची पालखी ८ जूनला श्री क्षेत्र नागझरी येथे दुपारी विश्रांती करून रात्री पारसला मुक्कामी राहील. ९ जून रोजी गायगाव येथे दुपारी विश्रांती, रात्री भौरद येथे मुक्कामी,  १० जून  अकोला येथे मुक्काम, ११ जून अकोला येथे मुक्काम, १२ जून भरतपूर विश्रांती, वाडेगावला मुक्काम, १३ जून देऊळगाव विश्रांती, पातूरला मुक्काम,  १४ जून मेडशीला विश्रांती, श्री क्षेत्र डव्हा येथे मुक्काम, १५ जून मालेगाव येथे विश्रांती, शिरपूर जैन येथे मुक्काम, १६ जून चिंचाळा पेनला विश्रांती, म्हसला पेनला मुक्काम, १७ जून किनखेडा येथे विश्रांती, रिसोडला मुक्काम,  १८ जून पानकन्हेरगावला विश्रांती, सेनगावला मुक्काम, १९ जून रोजी श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे विश्रांती, डिग्रस येथे मुक्काम, २० जूनला श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे विश्रांती, जवळा बाजार येथे मुक्काम, २१ जूनला अडगाव रजोबा हट्टा येथे विश्रांती, श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मुक्काम, २२ जूनला परभणी येथे विश्रांती, परभणी येथेच मुक्काम, २३ जून ब्राह्मणगाव येथे विश्रांती, दैठणा येथे मुक्काम, २४ जून  खळी येथे विश्रांती, गंगाखेड येथे मुक्काम, २५ जून वडगाव दादाहरी येथे विश्रांती, परळी येथे मुक्काम, २६ जून परळी येथे विश्रांती, परळी वैजनाथ येथे मुक्काम, २७ जून कन्हेरवाडी येथे विश्रांती, अंबाजोगाईला मुक्काम, २८ जून लोचंडी सावरगाव येथे विश्रांती, बोरी सावरगाव येथे मुक्काम, २९ जून गोटेगाव येथे विश्रांती, कळंब येथे मुक्काम, ३० जून गोविंदपूर येथे विश्रांती, तेरणा साखर कारखाना येथे मुक्काम, १ जुलै किनी येथे विश्रांती, उपळा माकडाचे येथे मुक्काम, २ जुलै श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथे विश्रांती, उस्मानाबाद येथे मुक्काम, ३ जुलै वडगाव सिध्देश्वर येथे विश्रांती, श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मुक्काम, ४ जुलै सांगवी येथे विश्रांती उळे येथे मुक्काम, ५ जुलै सोलापूर येथेच विश्रांती व मुक्काम, ६ जुलै सोलापूर येथेच विश्रांती व मुक्काम, ७ जुलै सोलापूर येथे विश्रांती, तिन्हे येथे मुक्काम, ८ जुलै कामती खु. वाघोली येथे विश्रांती, माचणूर येथे मुक्काम, ९ जुलै ब्रह्मपुरी येथे विश्रांती, श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे मुक्काम, १० जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा येथे विश्रांती घेवून रात्री पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचले. १० ते १५ जुलै पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या मंदिरात पालखीचा मुक्काम राहील. यादरम्यान आषाढी एकादशी उत्सवानिमित्त भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम श्री संस्थानच्या शाखेत होणार आहेत.

असा राहील परतीचा प्रवास!श्रींची पालखी १६ जुलै रोजी पंढरपूर येथून परतीच्या प्रवासा निघेले. रात्री करकेब येथे मुक्काम, १७ जुलै कुर्मदास येथे विश्रांती कुर्डूवाडी येथे मुक्काम, १८ जुलै रिधोरे येथे विश्रांती, उपलाई स्टेशन येथे मुक्काम, १९ जुलै भगवान बार्शी येथे मुक्काम, २० जुलै माणकेश्वर येथे विश्रांती, भूम येथे मुक्काम, २१ जुलै कुंथलगिरी येथे विश्रांती, चौसाळा येथे मुक्काम, २२ जुलै उदंड वडगाव येथे विश्रांती, पाली येथे मुक्काम, २३ जुलै बीड येथे विश्रांती व मुक्काम, २४ जुलै पेडगाव येथे विश्रांती, गेवराई येथे मुक्काम, २५ जुलै राहागड येथे विश्रांती, शहापूर येथे मुक्काम, २६ जुलै पारनेर येथे विश्रांती, लालवाडी येथे मुक्काम, २७ जुलै धनगर पिंप्री येथे विश्रांती, जालना येथे मुक्काम, २८ जुलै जालना येथे विश्रांती व मुक्काम, २९ जुलै न्हावा येथे विश्रांती, सिंदखेडराजा येथे मुक्काम, ३० जुलै किनगाव राजा येथे विश्रांती, बिबी येथे मुक्काम, ३१ जुलै किनगाव जट्टू येथे विश्रांती, लोणार येथे मुक्काम, १ आॅगस्ट सुलतानपूर येथे विश्रांती, मेहकर येथे मुक्काम, २ आॅगस्ट नायगाव दत्तापूर येथे विश्रांती, जानेफळ येथे मुक्काम, ३ आॅगस्ट वरवंड येथे विश्रांती, शिर्ला नेमाने येथे मुक्काम, ४ आॅगस्ट विहिगाव येथे विश्रांती, आवार येथे मुक्काम, ५ आॅगस्ट रोजी पालखी खामगाव येथे मुक्कामी राहील. ६ आॅगस्ट रोजी पहाटे शेगावकडे रवाना होई. याप्रमाणे तब्बल ७५० किलोमीटरचा प्रवास पुर्ण करून श्रींची पालखी संतनगरीत दाखल होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर