शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:24 IST

३३ दिवसांचा ७२५ किमीचा भक्तिपथावरचा प्रवास

अनिल उंबरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (जि. बुलढाणा) : संत गजानन महाराज संस्थानच्या श्रींच्या पालखीचे यंदा ५६वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी २ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून पालखी प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संतनगरीत भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ‘गण गण गणात बोते, ज्ञानोबा-तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी’च्या जयघोषात संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले आहे.

या पालखी सोहळ्यात ७०० हून अधिक वारकरी, रथ, मेणा, अश्व, पताका वाहणारे भक्त सहभागी होणार असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि श्री विठ्ठलनामाच्या जपात ३३ दिवसांचा सुमारे ७२५ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला जाणार आहे. 

१० जुलैपासून परतीचा प्रवास

पालखी ४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल आणि ९ जुलैपर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर येथील शाखेत मुक्कामी राहील. १० जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होईल. ३० जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम झाल्यानंतर ३१ जुलै रोजी पालखीचे शेगावमध्ये आगमन होईल.

बुधवारी पालखी अकोल्यात

पालखी प्रस्थानानंतर २ जून रोजी दुपारी ती श्रीक्षेत्र नागझरी येथे पोहोचेल. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीचा मुक्काम पारस येथे होईल. ३ जून रोजी पारसहून पालखी भौरद मार्गे ४ जूनला अकोला येथे दाखल होईल. अकोला येथे दोन दिवस मुक्कामानंतर नियोजित मार्गाने ४ जुलै रोजीच ती पंढरपूरला पोहोचणार आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022