शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उमलत्या वयात संस्कार महत्त्वाचे! - संकेश्वर पीठ शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:27 IST

उमलत्या वयात चांगले संस्कार न झाल्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे मत संकेश्वर पीठाचे (कर्नाटक) शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- ब्रम्हानंद जाधव 

बुलडाणा: उमलते वय हे कोऱ्या पाटी सारखे असते. त्यावर काहीही लिहीले ते उमटते. चांगले काय, वाईट काय, हे आपणच त्या बालकाला शिकवत असतो. आपल्या वागण्यातून ते बालक अनुकरण करत असते. त्यामुळे बालवयातच योग्य संस्कार घडणे महत्वाचे आहे. उमलत्या वयात चांगले संस्कार न झाल्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे मत संकेश्वर पीठाचे (कर्नाटक) शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते बुलडाणा येथे नवदुर्गा यज्ञ सोहळा व पुन: प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त आले असता त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न: नवीन वर्ष केव्हा साजरे करावे?

उत्तर: १ जानेवारी हे इंग्रजांचे नवीन वर्ष आहे, ते आपले नवीन वर्ष नाही. आपल्या संस्कृतीचे नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते. त्यामुळे १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करू नये. आपण गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. ३१ डिसेंबर ही इंग्रजांची वर्षअखेर आहे. या दिवशी तरुणांचा व्यसनाधीन होऊन चालणारा धिंगाणा ही वाईट प्रवृत्ती समजल्या जाते. संस्काराचा अभाव असल्याने असे व्यसनाधीन होऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत.

प्रश्न: मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळतात का?

उत्तर : आज शाळा शिक्षण देण्याचे काम चांगल्या परिने पूर्ण करत आहेत. परंतू मोठ-मोठ्या शाळा मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देऊ शकत नाहीत. संस्कार देण्यामध्ये ह्या शाळा कमी पडत आहेत. परिणामी, उमलत्या पिढीला शिक्षण मिळते पण संस्कार मिळत नाही.

प्रश्न: शाळेत कोणत्या शिक्षणाची आवश्यकता आहे?

उत्तर: मुलांना संस्कार देण्याची गरज धर्म पूर्ण करू शकतो. म्हणून शाळेत नैतिक मूल्यांचे धर्मशिक्षणही देणे आवश्यक आहे. कर्नाटकमधील संकेश्वर पीठ हे शृंगारीचे मुख्य पीठ आहे. संकेश्वर पीठामार्फत लहान मुलांना नैतीक व धार्मिक शिक्षण देण्याच काम केले जाते. आज मुलांना नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

प्रश्न: धर्मपीठांचे कर्तव्य काय आहे?

उत्तर: आजच्या धर्मपीठांनीही उमलत्या पिढीवर नीतिमूल्यांचे संस्कार रुजवण्याचे काम कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे. मुलांना संस्कारक्षम करणे हे धर्मपीठांचे मोठे कर्तव्य आहे. कच्च्या मातीलाच आकार दिला जाऊ शकतो, त्याप्रमाणे उमलत्या वयात झालेले संस्कार हे आयुष्यभर टिकून राहतात. म्हणून उमलत्या वयात संस्कारांची खरी गरज आहे. ही गरज धर्मपीठांमधूनही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावे.

प्रश्न: ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी काय करता येईल?

उत्तर: सध्याचे समाजजीवन हे वाढलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी येणारे ताण-तणाव यामुळे असमाधानी बनले आहे. आणि म्हणून समाधान शोधण्यासाठी सध्या लोकांचा कल धार्मिक वा आध्यात्मिक उपक्रमांकडे वाढलेला आहे, हे मला माझ्या भ्रमंतीमध्ये ठळकपणे लक्षात आले. ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी आध्यात्मिक मार्ग पत्करला पाहिजे.

प्रश्न: राम मंदिराविषयी काय सांगू शकाल?

उत्तर: राम मंदिराच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून बघितल्या जाऊ नये. राजकारणामुळेच मंदिर प्रश्नाचा खरा विचका झालेला आहे. दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंनी जर आपसात संवाद साधला तरच हा प्रश्न सगळ्यांचे समाधान होऊन निकाली निघू शकतो. परंतु त्यासाठी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंची चर्चा करण्याची तयारी हवी. अगोदरच्या काही चर्चा निष्फळ ठरल्या म्हणजे पुढे निष्फळ ठरतील असे नाही, आशावाद हा महत्वाचा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत