शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी योजनेचे १ कोटी ९४ लाख थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:05 IST

 मेहकर : मेहकर येथील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून १ कोटी ९४ लाख रूपये थकले आहे. अनुदानासाठी लाभार्थी दररोज चकरा मारत आहेत. मात्र प्रभारी अधिकाºयामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब वयोवृध्द, विधवा, अपंग, परितत्या, ...

ठळक मुद्दे शासनाची ही योजना चांगली असली तरी पण या योजनेत मेहकर तालुक्यात अनेक बोगस लाभार्थ्यांचा समावेश सुध्दा आहे.संजय गांधी कार्यालयाअंतर्गत श्रावण बाळ योजनेचे ११ हजार ८८७ तर संजय गांधी निराधार योजनेचे ४ हजार २६७ असे एकूण १६ हजार १५४ लाभार्थी आहेत. कार्यालयातील कर्मचारी सुरूळीत काम करीत असले तरीपण कायम स्वरूपी अधिकारी नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे.

 मेहकर : मेहकर येथील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून १ कोटी ९४ लाख रूपये थकले आहे. अनुदानासाठी लाभार्थी दररोज चकरा मारत आहेत. मात्र प्रभारी अधिकाºयामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब वयोवृध्द, विधवा, अपंग, परितत्या, आदिंसाठी शासनाने संजयगांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दरमहा अनुदान देण्यात येते. शासनाची ही योजना चांगली असली तरी पण या योजनेत मेहकर तालुक्यात अनेक बोगस लाभार्थ्यांचा समावेश सुध्दा आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासुन सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून आॅनलाईन पद्धत सुरू झाल्याने बोगस लाभार्थी कमी झाले असले तरी मागच्या काळात ज्यांना अनुदान मंजुर झाले आहे, त्यांना अजुनही अनुदान सुरू आहे. त्यामुळे खरे व पात्र लाभार्थी शासनाच्या या योजनापासून वंचित राहत आहेत. संजय गांधी कार्यालयाअंतर्गत श्रावण बाळ योजनेचे ११ हजार ८८७ तर संजय गांधी निराधार योजनेचे ४ हजार २६७ असे एकूण १६ हजार १५४ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे १ कोटी ९३ लाख ८४ हजार ८०० रूपये अनुदान थकित आहे. अनुदान मिळण्यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थी दररोज संजय गांधी कार्यालयात चकरा मारत आहेत. संजय गांधी कार्यालयातील नायब तहसिलदार यांचे पद रिक्त असल्याने दुसºया नायब तहसिलदाराकडे प्रभार देण्यात आला आहे. कार्यालयातील कर्मचारी सुरूळीत काम करीत असले तरीपण कायम स्वरूपी अधिकारी नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे थकीत असलेले अनुदान लवकरात लवकर वाटप करण्यात यावे व कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Mehkarमेहकरgovernment schemeसरकारी योजना