शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील ‘सालवन’ प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 17:08 IST

संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा  प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे.

ठळक मुद्देसंग्रामपूर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. तालुक्यात जलसंधारणाची एकूण १०४ कामे विविध गावांत करण्यात आली. आदिवासी गाव सालवन तसेच संग्रामपूर तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा  प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. काकोडा गावाचा दुसरा तर रूधाना गावाला तृतीय क्रमांक मिळाला. यामुळे आदिवासी गाव सालवन तसेच संग्रामपूर तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.  या स्पर्धेचा निकाल १२ आॅगस्ट रोजी पुणे येथील कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सिने अभिनेता अमिरखान, पत्नी किरण राव, गिरीश कुळकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते सालवनचे रेमू डावर यांना प्रथम पुरस्काराचे प्रमाण देण्यात आले. यावेळी गावातील शांताबाई चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होत्या.  संग्रामपूर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. तालुक्यात जलसंधारणाची एकूण १०४ कामे विविध गावांत करण्यात आली. कुडामातीचे घर असलेल्या रेमू डावर व राजेश चव्हाण, जागेश कच्छवार, शांताताई चव्हाण व ज्योती भिलावेकर यांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेवून गावातील आदिवासी बांधवांना श्रमदान करण्यास प्रोत्साहीत केले. दररोज येथे ६० ते ७० नागरिक श्रमदान करत होते. विशेष म्हणजे २३ एप्रील रोजी आमिर खान व किरण यांनी सालवन गावाला भेट देऊन गावकºयांसोबत काम केले होते. दरम्यान सालवन गावाला त्यांच्या कष्टाचे फळ  मिळाले असून सालवन गावाने प्रथम क्रमांक पटकावला.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा