शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात चंदन चोरटे पुन्हा सक्रिय; परिपक्व झाडे केली लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 11:46 IST

Sandalwood thieves reactivated in Buldhana : तब्बल सहा चंदनाची परिपक्व झाडे चोरट्यांनी लंपास केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेले चंदन चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आणि तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या निवासस्थानातून तब्बल सहा चंदनाची परिपक्व झाडे चोरट्यांनी लंपास केली आहेत.अद्याप याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसला तरी त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातून चार तर तहसीलदारांच्या निवासस्थानातील दोन झाडे चोरट्यांनी लंपास केली आहेत. विशेष म्हणजे ही झाडे तोडण्यासाठी आधुनिक चेन सॉ चोरट्यांनी वापरल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त होत आहे. ही झाडे तोडून परिपक्व झालेली अर्थात ७५ ते ८५ सेमीचा घेर असलेलीच चंदनाची झाडे या चोरट्यांच्या रडावर असतात. या घटनेमध्ये ही बाब स्पष्ट होत आहे.यापूर्वी बुलडाणा शहरातील शासकीय निवासस्थानांच्या जागी असलेल्या चंदनाच्या झाडांची यापूर्वी अशाच पद्धतीने चोरी झालेली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान असो की जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्टेट बँकेचा परिसर असो, या भागात यंत्रणेलाच आव्हान देत अशा पद्धतीने यापूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झालेली आहे. त्यामुळे चंदन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खुल्या बाजारात चंदनाच्या परिपक्व खोडाला मोठी मागणी व किंमत आहे. त्यातून चंदनाच्या झाडांची ही चोरी होत आहे.अज्ञात चोरट्यांनी तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या ‘कोटपूर्णा’ या निवासस्थानातून १ जुलैच्या मध्यरात्री दोन आणि अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या ‘संत चोखामेळा’ निवासस्थानातून चार अशी सहा चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली. याबाबत बुलडाणा शहर पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल होत  असल्याचे तहसीलदर रूपेश खंडारे यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगल