शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला रेती साठा गेला चोरीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:45 IST

खामगाव : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने जप्त केलेल्या रेती साठ्यातील रेती चोरीस गेल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने जप्त केलेल्या रेती साठ्यातील रेती चोरीस गेल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी महसूल विभागाकडून पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.खामगाव तालुक्यातील वाडी आणि निमकोहळा येथील ११० ब्रास अवैध रेती साठा अप्पर जिल्हाधिकाºयांच्या पथकाने जप्त केला होता. जलंब येथे अवैध रेती वाहतूक करणाºया टिप्परने एका महिलेस २० जुलै रोजी चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर लागलीच दुसºया दिवशी म्हणजेच २१ जुलै रोजी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या पथकाने खामगाव शहरापासून जवळच असलेल्या वाडी येथील गट नं. ८ मधील ५५ ब्रास रेती साठा जप्त केला होता. त्याचप्रमाणे निमकोहळा येथील गट नं २२५ मधील ५५ ब्रास रेतीसाठा असा एकुण ११० ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते, नायब तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, शिपाई हिवाळे आणि चालक यादव यांनी ही धडक कारवाई केली. त्यानंतर महसूल प्रशासनाकडे या साठा सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, वाडी येथील गट नं. ८ मधील ५५ ब्रास रेतीपैकी काही रेती माफीयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (प्रतिनिधी)

अप्पर जिल्हाधिकाºयांनी जप्त केलेल्या साठ्यातील रेती चोरीस गेली आहे. रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तींनी ही रेती चोरून नेली असावी. याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात येणार आहे.- डॉ.शीतलकुमार रसाळतहसीलदार, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा