शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...खामगावात व्हॉल्व्ह गळतीतून निघणाऱ्या पाण्याचीही विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 11:58 IST

पाईपलाईनमधील गळतीतून निघणाऱ्या पाण्याचीही आता खामगावात विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे शहरात खासगी पाण्याच्या विक्रीत वाढ झाली आहे.व्हॉल्व गळतीतून निघणारे पाणीही आता विकले जात आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून विलंबाने पाणीपुरवठा होत असल्याने  शहरात खासगी पाण्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. विहिरीसह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील गळतीतून निघणाऱ्या पाण्याचीही आता खामगावात विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.खामगाव शहराला नगरपालिका प्रशासनाकडून ९ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यावेळी दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुरूवातीचे पाणी नागरिकांना नाल्यात सोडावे लागते. परिणामी नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहात नाही. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व आणि इतर गळतीच्या ठिकाणी नागरिकांची पाणी भरण्यासाठी गर्दी होते. अनेकजण या ठिकाणाहून पिण्याचे तसेच अन्य वापरासाठी पाणी भरतात. मात्र, ज्यांना येथून पाणी भरणे शक्य होत नाही, त्यांना विकतच्या पाण्याचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात टँकरच्या पाण्याची विक्री वाढली आहे. शहरानजीकच्या विहिरींसोबतच व्हॉल्व गळतीतून निघणारे पाणीही आता विकले जात आहे.

पाच रुपये कॅनप्रमाणे विक्री!खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईनला घाटपुरी रोडवर दोन ठिकाणी गळती लागली आहे. याठिकाणी खामगाव शहरातील नागरिक पिण्याचे पाणी भरतात. त्याचवेळी पाच रुपये कॅनप्रमाणे पाणी उपलब्ध करून देणारेही येथीलच पाण्याचा वापर करतात.

पाणी विक्रीसाठी सायकल, रिक्षाचा वापर!एखाद्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्यास रिक्षातून कॅनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाच रूपयाला २० लीटर तर १५० रुपयांना एक हजार लीटर पाणी घरपोच उपलब्ध करून दिले जाते. काहीजण कॅनमधून घरपोच पाणी विकत देत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावWaterपाणीbuldhanaबुलडाणा