लोणार (बुलडाणा) : राज्यात सर्वत्र महिन्याच्या एक तारखेला कर्मचार्यांचा पगार व्हावा, या हेतूने ऑनलाइन वेतनप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली तांत्रिक बिघाडामुळे त्रासदायक ठरत असून, तालुक्यात माध्यमिक शिक्षकांसह विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचार्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे.ऑनलाइन वेतनप्रणालीमुळे सर्वच कर्मचार्यांना वेतन वेळेवर मिळणे अपेक्षित आहे. परंतु, तालुक्यात तसे होताना दिसून येत नाही. तीन महिन्यांपासून शासकीय कर्मचार्यांचे वेतन न झाल्यामुळे त्यांच्यासमोर दिवाळीसारख्या सणात आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. माध्यमिक शाळेवरील शिक्षकांचा सप्टेंबर महिन्याचा पगार अजूनपर्यंत झालेला नाही. हा पगार वास्तविक दसर्यापर्यंत होणे शिक्षकांना अपेक्षित होते. ऑनलाईन वेतनप्रणालीद्वारे सर्वच शासकीय कर्मचार्यांचे वेतन महिन्याच्या एका तारखेला होण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत, अशी मागणी कास्ट्राइबचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावळे यांनी शिक्षणाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऐन दिवाळीच्या काळात वेतनासाठी प्र तीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे वेतन २३ ऑक्टोबरपूर्वी देण्याची मागणी आहे.
शासकीय कर्मचा-यांचे वेतन रखडले
By admin | Updated: October 16, 2014 00:50 IST